गडचिरोली : राज्यात लग्नसमारंभ, वाढदिवस तसेच मोठ्या प्रमाणात जेवणाचे कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी आता अन्न व औषध प्रशासनाची रीतसर परवानगी घ्यावी, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी निर्देश दिले आहेत. गडचिरोली येथे अन्न व औषध विभागाच्या इमारतीचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी मंत्री आत्राम यांनी विधानभवन परिसरातील उपहारगृहातील अस्वच्छतेबद्दल भाष्य करून त्यांना अन्न व औषध प्रशासनाची परवानगीची अट घातली होती. अनेकदा जेवणातून होणाऱ्या विषबाधेचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे लग्नसमारंभ असो की वाढदिवस ज्या ठिकाणी जेवणाचे मोठे आयोजन केल्या जाते यापुढे त्यांनादेखील अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल, असे मंत्री आत्राम म्हणाले.

हेही वाचा – आता हे काय नवीन! रुग्णांकडे लक्ष द्यावे, की वाहन सांभाळावे? रुग्णांच्या नातेवाईकांसमोर यक्ष प्रश्न…

हेही वाचा – गोंदिया : पावसाने उसंत घेतल्याने धान मळणीला गती; मात्र, अवकाळी पावसामुळे….

गडचिरोली येथे आजपर्यंत अन्न व औषध विभागाची स्वतंत्र इमारत नव्हती. मात्र, आपण मंत्री झाल्यानंतर सर्वात आधी यासाठी प्रयत्न केले व आज त्याचे भूमिपूजन पार पडत आहे, असेही आत्राम यांनी यावेळी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What did minister atram say on the wedding ceremony and birthday program ssp 89 ssb
Show comments