नागपूर : दिवाळीला भेसळ रोखण्यासाठी राज्यात सगळीकडे भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. ज्या दुकानात भेसळ आढळले तर संबंधित वस्तू तयार करणारी कंपनी आणि दुकान बंद करण्यात येईल. जे भेसळ करतील त्यांना शिक्षा भोगावीच लागेल असा इशारा अन्न व औषध मंत्री धर्मराव आत्राम यांनी दिला.

धर्मराव आत्राम नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. दिवाळीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात भेसळ होत असताना भेसळ रोखण्यासाठी विविध जिल्ह्यांत पथक नियुक्त केले आहे. भेसळ करताना सापडले तर संबंधित कंपनी आणि दुकान बंद करण्यात येईल, असेही आत्राम यांनी सांगितले. काँग्रेस आणि सेनेचे अनेक लोक आमच्या संपर्कात असून गडचिरोलीतून मी लोकसभा निवडणूक लढणार हा माझा निर्धार झाला आहे. मी उभा राहिलो तर ती जागा शंभर टक्के जिंकणार आहे. मला उमेदवारी देण्याबाबत महायुती निर्णय घेईल मात्र मला उमेदवारी मिळेल, असा विश्वास आहे. मुख्यमंत्री दादा होतील आणि लवकरच होतील, असेही आत्राम म्हणाले.

हेही वाचा – राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट कायम, ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

हेही वाचा – नागपूर : ‘गडकरी साहेब… आमचे रस्ते चोरीला जात आहेत..’

अजित पवार हे पॉवरफुल नेते आहेत, त्यामुळे आमची पॉवर वाढली. फक्त आमचे दुर्दैव की ते सध्या डेग्यूने आजारी आहेत. नाही तर ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या पक्षाचा चारअंकी आकडा आला असता, असेही आत्राम म्हणाले. गडचिरोलीत आम्ही नंबर एकवर आहे. तिथे ३९ पैकी १६ ग्रामपंचायत आम्ही जिकल्या तर भाजपा २ तर काँग्रेस ३ ठिकाणी निवडून आले आहे.

Story img Loader