बुलढाणा : राज्याच्या भावी राजकारणाची दिशा ठरविणारा शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज येणार आहे. याचबरोबर शिंदे गटाचे जिल्ह्यातील आमदार संजय रायमुलकर यांच्या राजकीय भवितव्याचाही फैसला आज होणार आहे. यामुळे जिल्ह्यासाठी हा निकाल लक्षवेधी ठरला आहे.

दरम्यान, आजच्या निकालासाठी रायमुलकर मुंबईत दाखल झाले आहेत. प्रतिक्रिया देण्यास फारसे स्वारस्य न दाखविणाऱ्या या नेत्याने न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास असल्याचे सांगितले. लोकशाहीत बहुमत महत्त्वाचे असल्याने निकाल आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला. निकालाचा आपण सन्मान करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Maslow s pyramid loksatta
Money Mantra जोखमीची गुंतवणूक कोणती?
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
revenue minister chandrashekhar bawankule on son law loan catering money Wardha
“जावयाचं कर्ज नको, हे घ्या जेवणाचे पैसे,” महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असे का म्हणाले?
governor c p radhakrishnan warns poor water quality in rivers like godavari threatens human life
गोदावरीसह काही नद्यांची अवस्था बिकट, राज्यपालांकडून चिंता
Delhi election result updates in marathi
‘आप’ची मतपेढी फुटण्यावरच दिल्लीतील निकालाचे गणित?
lavasa loksatta news,
लवासा प्रकरण : सीबीआय चौकशीची मागणी कशाच्या आधारे ? उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना विचारणा
is state currently stopped issuance of birth certificates to track down illegal Bangladeshi citizens
अवैध बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू? ‘या’ आदेशाने चर्चेस बळ
supreme court on illegal foreign nationals in India
मुहूर्ताची वाट पाहता का?’ सर्वोच्च न्यायालयाकडून आसाम सरकारची कानउघाडणी

हेही वाचा – वर्धा : आंबटशौकीन मजनूस नागरिकांनी चोपले, मोबाईलमध्ये महिलांची छायाचित्रे

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महबंडात मेहकरचे आमदार संजय रायमुलकर व बुलढाणा आमदार संजय गायकवाड हे सुरतपासून सहभागी झाले. आमदारकीची हॅट्ट्रिक करणारे रायमुलकर यांच्याबरोबर पहिल्यांदाच आमदार झालेल्या गायकवाड यांनी आपली राजकीय कारकीर्द पणाला लावली. यानंतरच्या नाट्यमय घडामोडीत शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र ज्येष्ठ आमदार असतानाही रायमुलकर यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नाही. यानंतर शिवसेना कुणाची? यासाठीची लढाई निवडणूक आयोग ते सर्वोच्च न्यायालयात पोहोचली. ठाकरे गटातर्फे शिंदे गटाच्या १४ आमदारांना अपात्र ठरविण्याची याचिकाही दाखल करण्यात आली. यामध्ये रायमुलकर यांचाही समावेश आहे.

निकाल कदाचित विरोधात गेला तर रायमुलकर यांच्यासह आमदार गायकवाड यांचेही भवितव्य धोक्यात येणार आहे. यामुळे आजचा निकाल राज्याप्रमाणेच बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणावरदेखील परिणाम करणारा ठरणार आहे. लोकसभा तोंडावर आली असताना भाजपच्या ‘मिशन ४५’ मुळे खासदार प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीबद्धल राजकीय संभ्रम कायम आहे. या गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवर अपात्रतेप्रकरणी बहुप्रतिक्षित निकाल आज १० जानेवारीला येण्याची दाट शक्यता आहे. आज संध्याकाळी ४ वाजता विधानसभा अध्यक्ष नार्वेकर मुंबई स्थित विधानमंडळात क्रमाक्रमाने सर्व याचिकावर निकालाचे वाचन करणार आहे.

हेही वाचा – नागपूर : २०० कलाकार, उंट, घोडे आणि बरेच काही…

दरम्यान , दुसऱ्या टप्प्यात शिंदे गटात सहभागी होणारे खासदार जाधव हे ठाकरे गटाचे ‘लक्ष्य’ आहे. यामुळे मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यावर उद्धव ठाकरे व आमदार आदित्य ठाकरे यांनी जिल्हा पिंजून काढला. अपात्रतेच्या यादीत रायमुलकर यांच्या नावाचा समावेश याचाच भाग असल्याचे मानले जाते. खासदारांच्या मर्जीनुसार चालणारा एकनिष्ठ व निरुपद्रवी आमदार अशी त्यांची ओळख. मात्र ते चौदा आमदारांच्या यादीत आल्याने ते चर्चेत आले.

कार्यकर्ते ते आमदार

शिवसैनिक ते आमदार अशी राजकीय वाटचाल करणारे रायमुलकर हे २००९ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. प्रतापराव जाधव यांचा बालेकिल्ला असणारा मेहकर विधानसभा मतदारसंघ २००९ मध्ये अनुसूचित जातींसाठी राखीव झाला. प्रतापराव जाधव यांना तीनदा आमदार व युतीच्या काळात राज्यमंत्रीपद देणाऱ्या ‘प्रतापगड’ने रायमुलकर यांना २००९ ते २०१९ अशी तीनवेळा आमदारकीची संधी दिली. फारसा राजकीय संघर्ष करण्याची वेळ न आलेल्या या नेत्याच्या सुरळीत राजकीय जीवनातील मोठा फैसला आज होऊ घातला आहे.

Story img Loader