नागपूर : नागपूर ते शिर्डी समृद्धी मार्गावर पुन्हा शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गाचा पहिल्या टप्पा ११ डिसेंबर २०२२ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आणि अपघाताची मालिकाचा सुरू झाली. या अपघातासाठी वेगवेगळे तज्ज्ञाची मते जाणून घेतली जात आहेत. काहींच्या मते रस्ता बांधकामात दोष आहे तर काहींनी वेग मर्यादा यासाठी कारणिभूत सांगितली आहे. पण याबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी दिल्लीत गेल्या आठवड्यात झालेल्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले. ते वाचा.
राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम करताना मार्गाच्या दुतर्फा ठराविक अंतरावर प्रसाधन आणि विसाव्याची व्यवस्था केली जाते. अपघात प्रवण स्थळ शोधून त्रुटी दूर केल्या जातात. नागपूर ते मुंबई समृद्धी मार्गावर याचा अभाव दिसून येत आहे. हा राज्याचा प्रकल्प आहे. येथे केंद्राचा संबंध नसला तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. या मार्गावरील अपघात कमी व्हावेत यासाठी पुन्हा त्यांच्याशी चर्चा करणार आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ते दिल्लीत मंगळवारी पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा… Buldhana Accident: वर्ध्यातील एकुण बारा प्रवाशांची आत्तापर्यंत ओळख पटली; सर्वत्र हळहळ
गडकरी म्हणाले, “समृद्धी मार्ग राज्य सरकारने बांधला असला तरी या रस्त्यांवरील अपघातांबाबत लोक मलाच प्रश्न करतात. हा महामार्ग बांधणारी ‘एमएसआरडीसी’ या संस्थेचा संस्थापक मीच आहे. या मार्गावरील सुधारासाठी राज्य सरकारशी पुन्हा चर्चा करणार आहे.