नागपूर : विदर्भात आयोजित करण्यात येत असलेल्या ॲडव्हाटेंज विदर्भाच्या उद्घाटनासाठी रतन टाटा, अनिल अंबानी हे मोठे उद्योगपती येतील मात्र आपल्याकडे अंबानी टाटा केव्हा तयार होतील. आपण प्लास्टीकच्या पिशव्या आणि मेणबत्ती तयार करणार का असा सवाल करत गडकरी यांनी उद्योजकांना विदर्भात उद्योग वाढवा, असे आवाहन केले.

असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एड) जानेवारी महिन्यात खासदार औद्योग‍िक महोत्‍सव ‘ॲडव्हाटेंज विदर्भ’चे आयोजन करण्‍यात आले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित उद्योपतीच्या बैठकीत गडकरी बोलत होते. विदर्भाचा विकास करायचा असेल तर रेल्वेचे डब्बे न होता इंजिन बनले पाहिजे. तुम्ही काम करा आम्ही पाठिशी आहो असे सांगणारे अनेक समोर येतील, मात्र पुढाकार घेऊन मी करतो असे म्हणणारे कमी आहे, त्यामुळे डब्बे हऊन फायदा नाही इंजिन बना आणि विदर्भाच्या औद्योगिक विकास कसा करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन गडकरी यांनी उद्योजकांना केले.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात

हेही वाचा – गडकरी म्हणतात, ‘शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहे…’

हेही वाचा – यवतमाळमध्ये २५ एकरात फूड पार्क, पाच हजार कोटींची गुंतवणूक

‘ॲडव्‍हांटेज विदर्भ’चा उद्देश शेतकऱ्यांच्‍या आत्‍महत्‍या कमी करणे व युवकांना रोजगार उपलब्‍ध करून देणे हा आहे. विदर्भातील मागास जिल्‍ह्यातदेखील उद्योगाचा विकास झाल्‍यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, त्‍याने गरीबी दूर होईल आणि विदर्भात समृद्धी येईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.