नागपूर : शास्त्रज्ञांनी संशोधन केले, पण जर ते तळागळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसेल तर त्याचा काय उपयोग, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. आशिया खंडात लिंबूवर्गीय फळांसंदर्भातील संशोधन, तंत्रज्ञान या विषयावर चर्चा आणि ज्ञानाच्या आदान-प्रदानासाठी नागपुरातील हॉटेल सेंटर पाईंटमध्ये तीन दिवसांची परिषद आजपासून सुरू झाली. इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चरतर्फे ‘एशियन सिट्रस काँग्रेस-२०२३’चे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

हेही वाचा – “काही तरी नक्कीच शिजत आहे”, फडणवीस यांच्या मी पुन्हा येईनवर वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष

हेही वाचा – रेल्वेच्या नागपूर विभागाने एका दिवसात केले १२.१५ लाख रुपये वसूल

गडकरी म्हणाले, इच्छा आहे तर मार्ग आहे. आणि इच्छा नसेल तर सर्वे, संमेलन, परिषद, समिती, उपसमिती, संशोधन गट या सारख्या बाबीमध्ये ते अडकून पडते. मी शास्त्रज्ञांचा आदर करतो. त्यांच्यावरी टीका म्हणून नाही परंतु परिश्रमपूर्वक केलेले संशोधन तगळागळातील शेतकऱ्यांना सहायक ठरत नसेल तर त्याचा काय उपयोग आहे. ते सरकारच्या आलमारीची शोभा वाढवेल. त्यामुळे यावर काही तरी मार्ग काढला पाहिजे आणि त्याबाबत शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहे, असेही गडकरी म्हणाले.