नागपूर: जून महिन्यात पावसाळा सुरू होतो. मान्सून कधी दाखल होणार याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जातो. पण या शिवायही अन्य मार्गाने याबाबत मांडणी केली जाते.वेदांग ज्योतिषी व कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकचे डॉ. मुकुंद मोहोळकर यांनी याबाबत मांडणी आहे.मोहोळकर यांनीदिलेल्या माहितीनुसार १४ मे २०२४ ला रवीने वृषभ राशीत संध्याकाळी ५ वाजून २१ मिनिटांनी प्रवेश केला. तो कृतिका नक्षत्रात आहे त्यानंतर २५ मे ला रवी रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल व नंतर ८ जूनला रवी मृग नक्षत्रात प्रवेश करेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागेच १९ जानेवारी  २०२४ ला सांगितल्याप्रमाणे यावर्षी पावसाळा लवकर सुरू होणार आहे व पाऊस सरासरी च्या ९८ टक्के पडेलच. रवीच्या प्रत्येक नक्षत्र भ्रमणाच्या वेळेस पर्जन्यसाठी इतर ग्रहमान व त्यांची गती पावसासाठी अनुकूल आहे. फक्त रवीचे शेवटचे दोन पर्जन्य नक्षत्र( हस्त व चित्रा नक्षत्र) त्यावेळेस पर्जन्यमान कमी पडेल (साधारण १३ सप्टेंबर पासून पुढे पावसाचा जोर कमी होईल) तरी शेतकरी  व संबंधितांनी आपल्या कामाचे नियोजन  करावे. ग्रहांचे नक्षत्र भ्रमण बघता असे दिसून येते की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आठ जून पर्यंत पेरणी केल्यास बरे होईल.

हेही वाचा >>>प्रेम,नकार आणि वाघाची शिकार…; काय आहे नेमके प्रकरण ?

 १७ ते १९ मे दरम्यान पाऊस अंदमान निकोबार बेटावर पोहोचेल त्या दरम्यानच्या त्याच्या प्रवासात दक्षिण केरळ, तामिळनाडू, पूर्व- दक्षिण आंध्र प्रदेश मध्ये चांगला व जोरदार पाऊस पडेल. २१ मे दरम्यान वाऱ्याचा वेग आणखीन वाढेल तसेच पाऊस लक्षद्वीप बेटावर हजेरी लावेल पुढचा प्रवास जलद गतीने करत २७ मे दरम्यान तो केरळ किनारपट्टीवर पोहोचेल, २७ मे- २९ मे दरम्यान पाऊस केरळला दाखल होईल त्यावेळेस केरळ, तामिळनाडू, दक्षिण पश्चिम कर्नाटक मध्ये पाऊस दरवर्षीपेक्षा तीन दिवस अगोदरच पोहोचलेला असेल.

हेही वाचा >>>प्रेम प्रकरणाला विरोध, लग्नास नकार! नैराश्यग्रस्त तरुणीने उड्डाणपुलावरून उडी घेऊन संपविले जीवन

 ३१ मे ते २ जून दरम्यान तो गोवा व कोकण किनारपट्टीवर पाऊस पोहोचेल त्याचा प्रवास अति जलद असून ५ जून दरम्यान  वरुणराजा मुंबईत दाखल होईल. ८ जून दरम्यान तो अर्धा महाराष्ट्र व्यापलेला राहील. विदर्भात पाऊस साधारण ११ ते १५ जून दरम्यान पोहोचेल पण ५ जून नंतरच वादळी वाऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात, मराठवाडा, पूर्व विदर्भात मान्सून सरी पडण्यास सुरुवात होईल.

 १५ ते १८ जून दरम्यान पाऊस मध्य प्रदेश मध्ये दाखल होईल एकंदरीत २९ मे ला केरळमध्ये पोहोचलेला पाऊस १५ जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल. ५ जुलै ते १९ जुलै दरम्यान पाऊस उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब पर्यंत पोहोचलेला असेल. ग्रहांच्या नक्षत्र भ्रमण गती प्रमाणे पाऊस यावर्षी उत्तम आहे, असा दावा डॉ. मुकुंद मोहोळकर यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What do experts say about weather forecasting according to constellations nagpur cwb 76 amy
Show comments