अकोला : भंगार व निरुपयोगी साहित्य विक्री करून रेल्वे प्रशासन मालामाल झाले आहे. या माध्यमातून रेल्वेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झाला. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात भंगार विक्रीतून प्राप्त होणाऱ्या महसुलात सर्वाधिक वाढ झाली. तब्बल ११२.९३ कोटी रुपये रेल्वेला भंगार विक्रीतून मिळाले आहेत. ११२ वॅगन, २७ इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन भंगारात विकण्यात आले आहे. याशिवाय विविध निरूपयोगी साहित्याची भंगारात विक्री केली.

भुसावल मंडळाने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी निश्चित केलेले भंगार विक्रीचे लक्ष्य पार करून एक महत्त्वपूर्ण उपलब्धी साधली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावल मंडळाने ८५ कोटी रुपये असलेल्या आंतरिक लक्ष्याला पूर्ण करून ११२.९३ कोटी रुपयांची भंगार विक्री केली. निश्चित उद्दिष्ट पेक्षा ३२.८७ अधिक महसूल भुसावळ विभागाने प्राप्त केला. ही विक्री मध्य रेलवेच्या कोणत्याही विभागाने या आर्थिक वर्षात साधलेली सर्वात मोठी भंगार विक्री आहे. यापूर्वी भुसावल मंडळांने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ११० कोटी रुपयांची भंगार विक्री केली होती.

‘पी-वे स्क्रॅप’ १६ हजार ९३६ मेट्रिक टन विकले. लक्ष्यापेक्षा १६९.३६ अधिक विकण्यात आले. ११२ वॅगन स्क्रॅपमध्ये विकल्या. उद्दिष्ट ७५ वॅगनचे होते. त्यात १४९.३३ टक्के वाढ झाली. ‘फेरस मेटल’ चार हजार २४६ मेट्रिक टन विक्री केली असून उद्दिष्टापेक्षा २१२.३२ टक्के जास्त आहे. इलेक्ट्रिक लोको २७ विक्री करण्यात आले. लक्ष्य २५ चे होते. १०८ टक्क्याने वाढ झाली. ‘नॉन-फेरस मेटल’ ७७.३७८ मेट्रिक टन विक्री झाले असून १०३.१७ टक्के वाढ झाली. ही उल्लेखनीय कामगिरी सर्व कारखाने आणि शेड्सच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. त्यांचे स्क्रॅप सामग्रीचे निवारण करण्यासाठी अथक प्रयत्न असतात. ‘जीरो स्क्रॅप मिशन’ला यशस्वी बनविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. भुसावल मंडळाच्या सर्व डिपोला ‘स्क्रॅप-मुक्त’ स्थिती प्राप्त करण्याच्या वचनबद्धतेवर ठाम आहे आणि या दिशेने सतत कार्यरत आहे. ही उपलब्धी भुसावल मंडलाच्या कार्यकुशलतेची, समर्पणाची आणि टीमवर्कची अप्रतिम उदाहरण आहे, जी भारतीय रेल्वेच्या संचालनाला आणखी अधिक कार्यक्षम आणि पर्यावरण अनुकूल बनविण्यात मदत करत असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. रेल्वेला मोठा महसूल प्राप्त झाला.