नागपूर : विकसित देशांच्या यादीत नाव नोंदवण्यासाठी केंद्र सरकार विकास प्रकल्पांचा मार्ग सहजपणे मोकळा करण्याच्या मागे लागले आहे. शहरापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी येथील जमीन कोळसा खाणीसाठी अदानी समुहाला देण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज, गुरुवारी त्यावर जनसुनावणी आयोजित केली. या जनसुनावणीला माजी मंत्री अनिल देशमुख पोहोचले, पण तोपर्यंत गावकरी व पर्यावरणवाद्यांनी केलेल्या विरोधामुळे ही जनसुनावणीच रद्द झाली होती. त्यामुळे देशमुखांन आल्यापावली परत जावे लागले.

कोळसा खाण परिसरातील २४ ग्रामपंचायती तसेच पर्यावरणवाद्यांनी या खाणीला विरोध केला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पत्र देत खाणीला विरोध दर्शवला. सर्वच स्तरावरून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर १३ जुलैला कळमेश्वर तालुक्यातील कारली गावाच्या तलावाजवळ ही जनसुनावणी आयोजित करण्यात आली. सकाळी ११ वाजेपासूनच परिसरातील गावकरी, पर्यावरणवादी सुनावणीच्या ठिकाणी पोहोचले.

हेही वाचा – मध्यप्रदेशातून बुलढाण्यात होतोय प्रतिबंधित गुटख्याचा पुरवठा! सीमावर्ती मलकापुरात १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

हेही वाचा – गोंदिया शहरातील ४२ वॉर्डात दूषित पाणीपुरवठा; रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

पर्यावरणवादी व गावकऱ्यांनी मंडळाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे अखेरीस ही जनसुनावणी रद्द करण्यात आली. या जनसुनावणीत आमदार सुनील केदार हे सुरुवातीपासूनच गावकऱ्यांच्या बाजूने उभे होते. माजी मंत्री अनिल देशमुख हेदेखील त्या ठिकाणी पोहोचले, पण तोपर्यंत ही जनसुनावणी रद्द झाली होती. त्यांना याची काहीच कल्पना नव्हती. ते आले आणि म्हणाले, ‘चला, जनसुनावणी सुरू करा’. तेव्हा एका पर्यावरणवाद्याने त्यांना जनसुनावणी रद्द झाल्याचे सांगितले आणि देशमुख आल्यापावली परतले.

Story img Loader