वर्धा : आजच्या धकाधकीच्या जीवनात अतीताणामुळे मद्यपान वाढत आहे. अलीकडे केलेल्या एका अभ्यासात असे सिद्ध झाले आहे की अति मद्यपान करण्याने सार्वजनिक आरोग्य संकट निर्माण होऊ शकते, असे मत मेघे अभिमत विद्यापीठातील मानसोपचार तज्ञ डॉ. प्रकाश बेहरे व्यक्त करतात.

जर तुमच्या जवळची व्यक्ती जास्त मद्यपान करत असेल तेव्हा तुम्ही काय कराल? जरी अशी व्यक्ती आपले काम नीट करत असेल, नातेसंबंध जपत असेल तरी याचा अर्थ असा नाही की जास्त मद्यपान करण्यात कोणताही धोका नाही. असा अट्टल पण छुपा मद्यपी काही बाबींतून ओळखता येतो.

Electric bike overcharging Be careful
इलेक्ट्रिक बाईक जास्त चार्ज करता? वेळीच व्हा सावध, नाहीतर निर्माण होईल मोठी समस्या
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
wardha microvascular plastic surgery marathi news
प्लास्टिक सर्जरीने संभाव्य अपंगत्वावर मात, विदर्भात फक्त इथेच…
Student Support Committee Pune  organization working for needy students
स्कॉलरशिप फेलोशिप: ‘विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे’; गरजू विद्यार्थ्यांचा पुण्यातला हक्काचा आधारवड
University of Mumbai, Artificial Intelligence Model,
कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलच्या विकासासाठी मुंबई विद्यापीठाची अनोखी झेप! आजारांचे आगाऊ निदान होणार…
Odisha Crime News
Odisha Victim : “पोलिसाने माझी अंतर्वस्त्रं काढली, मला बांधलं मारहाण केली आणि…”, वेदना मांडताना ओडिशा पीडितेच्या डोळ्यात अश्रू
Mumbai Navnirman vidnyan prabodhan
सर्वकार्येषु सर्वदा: विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीसाठी ‘विज्ञान प्रबोधन’
chaturang nature disorder harmful to society Personality American Psychological Association
स्वभाव-विभाव: समाजासाठी विघातक विकार

हेही वाचा – काँग्रेस कामगार सेल जिल्हाध्यक्ष संकत यांच्या जुगार अड्ड्यावर छापा

१. मद्यपी सामान्यत : अन्नापेक्षा अल्कोहोलला प्राधान्य देतो, अनेकदा असे लोक जेवणाऐवजी त्यांचे पेय घेतात. बरेचदा त्यांची खाद्यपदार्थांवरची इच्छा उडून जाते.

२. दीर्घकाळ नियमितपणे मद्यपान केल्याने त्यावरील अवलंबित्व सुरू होते. ते सतत मद्यपींच्या रक्तात असते आणि त्यांचे शरीर कधीही सोडत नाही.

३. मानसिकदृष्ट्या, मद्यपी दारूवर अवलंबून असतात. एक-दोन दिवस दूर राहावे लागल्यास ते अस्वस्थ आणि चिडचिडे होतात.

४. एक कार्यरत मद्यपीचे एक किंवा दोन ग्लास पेयाने समाधान होत नाही. ते आणखी मागत राहातात. त्यांच्याकडे अल्कोहोलसाठी उच्च सहनशीलता असते कारण त्यांचे शरीर भरपूर प्रमाणात मद्य पचवण्यासाठी अनुकूल झालेले असते.

५. स्मरणशक्ती कमी होणे आणि मेंदूचे कार्य मंदावणे : अल्कोहोलचा परिणाम मज्जासंस्थेवर होतो. अति मद्यपान केल्याने त्यांची स्मरणशक्ती कमी होते. त्यांना काही गोष्टी आठवू शकत नाहीत.

६. वास्तव नाकारणे : जेव्हा एखादी व्यक्ती जास्त प्रमाणात अल्कोहोल घेते तेव्हा तो/ ती ही गंभीर समस्या असल्याचे मान्य करत नाही. त्यांना त्यांचे मनोरंजन गमवायचे नसल्याने ते वास्तव नाकारतात आणि या विषयात विचारले असता खोटे बोलतात.

७. संवेदनाहीन औचित्य : कार्यरत व्यसनाधीनांना मोठ्या प्रमाणात मद्यपान करण्याचे निमित्तच हवे असते. ते वेगवेगळी कारणे देतात जसे की, “मी पितो कारण मला कामाचा ताण आहे” किंवा “मला फक्त माझ्या मित्रांसोबत आराम करायचा आहे”.

८. मद्यपी दारू लपवतात : कार्यरत मद्यपी सहसा त्यांचे पेय गुप्त ठिकाणी ठेवतात. कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ते दारू ठेवतात किंवा मद्यपान करतात.

९. वर्तन बदल : दारूचे व्यसन असलेल्या व्यक्तीला मूड स्विंग्सचा अनुभव येतो. त्यांचे मूड सतत बदलत राहातात. ते एखादा टोकाचा निर्णय घेण्याचीही शक्यता असते.

हेही वाचा – नागपूर : शिक्षणाची ओढ असताना लग्न ठरविल्यामुळे तरुणीची आत्महत्या

हे टाळता येवू शकते. वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा डॉ. बी. सी. रॉय पुरस्कार प्राप्त डॉ. बेहरे म्हणतात की, मित्रांसोबत पिणारा जेव्हा एकटा प्यायला सुरवात करतो तीच धोक्याची पहिली घंटा समजावी. असा कोणी संपर्कात आल्यास त्वरित तज्ञाशी संपर्क साधावा. व्यसनमुक्ती केंद्र सर्वत्र आहे. ते अश्या मद्यपीवर उपचार करतात. थेरेपी, आहार सल्ला, व्यायाम व अन्य कौशल्य वापरून सुधारणा होते. अतिरिक्त मद्यपान जीवास धोका ठरणार असल्याचे गळी उतरवल्या जाते.