नागपूर : जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी दुर्घटना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ शहरात. ४० वर्षांपूर्वी घडली होती. ही घटना हजारो नागरिकांसाठीच नव्हे तर प्रत्येक सजीवासाठी धक्कादायक ठरली होती. कीटकनाशक बनवणाऱ्या एका कंपनीच्या प्लांटमधून विषारी वायूची गळती झाली आणि पाहता पाहता अख्यं शहर गुदमरले. जे वाचले ते एकतर अपंग झाले किंवा काही महिन्यांनी मरण पावले. अशी वायू गळती पुन्हा झाल्यास कमीत कमी वेळेत व कमीत कमी गॅस सेंन्स दाखवून होणारी दुर्घटना टाळण्याचे प्रभावी संशोधन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) डॉ. रविशंकर रमेश आंबी यांनी केले. यामुळे आता दुर्घटना रोखता येणार आहे. हे संशोधन नेमके काय आहे हे आपण जाणून घेऊया.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता
डॉ. आंबी यांनी भौतिकशास्त्र या विषयातून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून पीएच.डी. पदवी प्रदान केली. ‘स्टडिज ऑन मेटल ऑक्साईड एनआयओ कोटेड झेडएनओ थीन फिल्म्स फॉर गॅस सेंन्सिंग एप्लिकेशन’हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. वायू गळती दुर्घटनेला प्रभावी मारक उपाय असलेल्या या प्रबंधात त्यांनी उपरोक्त विषयावर ४ आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर प्रसिद्ध केले व १ आंतराष्ट्रीय पुस्तक प्रसिद्ध केले. याशिवाय १ ‘पेटन्ट’ पब्लिश करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भोपाळ गॅस दुर्घटनेची इतिहासात नोंद आहे. यावर योग्य उपाय शोधण्यासाठी डॉ. आंबी यांनी संशोधनास सुरुवात केली. महाज्योतीकडून दरमाह ३५ हजार विद्यावेतन मिळाल्यानेच ४ वर्षात डॉ. आंबी यांनी आपला शोधप्रबंध यशस्वी पूर्ण केले.
हे ही वाचा…नागपूर : ‘नवरत्न’ म्हणजे काय? रेल्वेच्या ६,११२ स्थानकांवर ‘वाय-फाय’सेवा देणारी कंपनी कोणती?
असा वापर शक्य
या संशोधनाचा वापर हा मोठमोठ्या औद्योगिक कंपनीसह घरामध्येही होऊ शकतो. एखाद्या कंपनीमध्ये वायू गळती झाली असेल तर कमी वेळात ती निदर्शनास येऊ शकते. घरामध्ये गॅस गळती होऊन मोठी दुर्घटना टाळण्यास याचा वापर शक्य आहे. एखाद्या कंपनीमध्ये ‘सेंसर’वायू गळती निर्दशनास आणून देईल. किंवा त्याचा ‘बजर’वाजवून, तो सावधान करेल.
हे ही वाचा…नागपूर : परतीच्या पावसाचा मुक्काम लांबण्याची शक्यता ?
दुर्घटना कशी टळू शकते
एखाद्या कंपनीमध्ये वायूगळती झाली असेल तर नॉर्मल माणसाला ते निदर्शनास येणार नाही किंवा निदर्शनास येऊ पर्यंत खूप वायू गळती झाली असेल. तर ते थांबवने देखील अशक्य होईल. अशा वेळेस कमीत कमी गॅस लिक झालेला तो सेंसर वायू गळती निर्दशनास आणून देईल किंवा त्याचा बजर वाजवून, तो सावधान करेल. जेणे करून ताबडतोब वायू गळती थांबविता येईल. तसेच यामुळे मोठी दुर्घटना टाळता येईल.