लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: स्थानिक स्वराज्य संस्था म्हंटले की त्यांच्या तिजोरीत खडखडाट कायमचाच. अनेकदा कर्मचाऱ्यांच्या वेतनापुरतेही पैसे या संस्थांची असते. नागपूर महापालिका त्याला अपवाद नाही. न होणारी करवसुली व उत्पन्नाचे मर्यादित स्रोत यामुळे महापालिकेला नेहमीच सरकारवर अवलंबून राहावे लागते. पण महापालिकेने अशी योजना हाती घेतली की त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत सहा महिन्यांत तब्बल २०७ कोटी रुपये जमा झाले. या योजनेचे नाव आहे ‘लंडन स्ट्रीट’. जाणून घेऊया या योजनेचे वैशिष्ट्य.

लंडन स्ट्रीट हे लंडनच्या धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे नाव असून तो महापालिकेच्या ३१ हेक्टर जागेवर उभारण्यात येणार आहे. त्यात व्यापारी,निवासी गाळ्यांसह सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांचा अंतर्भाव असणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा महत्त्वाचा कांक्षी प्रकल्प आहे.मात्र मागील २० वर्षापासून तो रखडला आहे. त्याचे नाव लंडनस्टीट ऐवजी ऑरेंज सिटी सिटी, असे करण्यात आले होते. पण तो ओळखला जातो लंडन स्ट्रीट या नावानेच. सध्या या प्रकल्पाला गती मिळताना दिसत आहे.

आणखी वाचा-आता शिंदे गटावर घंटा वाजवण्याची वेळ आली, माजी मंत्री वडेट्टीवार यांची टीका

वर्धा मार्गावरील सहकार नगर मेट्रो स्थानक या दरम्यान ५.५ किमी रस्त्याच्या दोन्ही बाजूला या प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. या मार्गावरील एकूण १७ भूखंडांचे लिलाव केले जाणार आहे. त्यापैकी तीन भूखंडांचे लिलाव झाले असून त्यातून महापालिकेला तब्बल २०७ कोटी रूपये मिळाले आहेत. ऐकाच बांधकाम व्यावसायिकाने तीन भूखंड खरेदी केले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is london street that enriches nagpur municipal corporation cwb 76 mrj
Show comments