नागपूर : मध्य रेल्वेने एक्स्प्रेस गाड्यांना ‘मेमू’मध्ये रुपांतरित करण्यास सुरुवात केली असून, आता अजनी ते अमरावती एक्सप्रेस ही गाडी ‘मेमू’ म्हणून धावणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गाडी क्रमांक १२११९ अमरावती-अजनी एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२१२० अजनी-अमरावती एक्स्प्रेस १० जून २०२३ पासून धावणार आहे. या गाडीला आठ डबे असतील. मेनलाईन इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (मेमू) गाडीचा वेग पॅसेंजर गाड्यांपेक्षा अधिक असतो. ही गाडी सामान्यत: ३०० किमी ते ५०० किमी अंतरावरील शहरांदरम्यान धावते.

हेही वाचा – गोंदिया : मुलगा आहे की राक्षस! जन्मदात्रीचा खून केला; बनाव रचला, पण बिंग फुटलेच

‘मेमू’ ही भारतीय रेल्वेची प्रवासी वाहतुकीची नवीन आवृत्ती आहे. तिचा कमाल वेग सुमारे ५० किमी प्रतितास व सरासरी १०० किमी प्रतितास आहे. या नवीन गाड्यांमध्ये प्रत्येक डब्यात दोन शौचालये असतील आणि ती प्रवासी गाड्यांपेक्षा अधिक सुरक्षित आणि आरामदायी असेल, असे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is memu train where it will run rbt 74 ssb