नागपूर: रामटेक लोकसभा निवडणुकीत महायुतीचा परिभव होतोय, अशी शक्यता महायुतीच्याच अंतर्गत सर्वेक्षणातून वर्तवली जात असल्याने नेते धास्तावलेआहेत. पक्षाचा पराभव झाल्यास विजयी कॉंग्रेस उमेदवाराच्या पाठीमागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावण्याची तयारी सुरू झाली, अशी माहिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रामटेकमध्ये महायुतीचे राजू पारवे विरूद्ध महाविकास आघाडीचे श्याम कुमार बर्वे यांच्यात सामना झाला. वरवर हा सामना आघाडी विरुद्ध युती असला तरी तो ख-या अर्थाने कॉंग्रेस नेते सुनील केदार विरूद्ध भाजप नेते व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय वर्चस्वाचा आहे. त्याची सुरुवात ही निवडणुकीपूर्वी काही महिन्यांपूर्वी केदार यांना झालेल्या अटकेपासून झाली. केदार यांची तुरूंगातून सुटका झाल्यावर निघालेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्यांवर केलेल्या कारवाईमुळे गृहखात्याचा केदार यांच्यावरील राग स्पष्ट झाला. पुढे केदार समर्थक रश्मी बर्वे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यावर सत्ताधा- यांनी केदार यांचा राग बर्वे यांच्यावर काढला. त्यातून त्यांची उमेदवारी रद्द झाली. ऐनवेळी कॉंग्रेसला रश्मी बर्वे यांचे पती श्याम कुमार बर्वे यांना उमेदवारी द्यावी लागली. हे सर्व केदार यांना शह देण्याच्या प्रयत्नातूंन झाले. मात्र यातून रश्मी बर्वे यांच्या विषयी सहानुभूती निर्माण झाली अन् त्याचा फायदा त्यांचे पती व कॉंग्रेस उमेदवार शामकुमार बर्वे यांना झाला व ते विजयाचे प्रबळ दावेदार मानले जाऊ लागले. पोलीस यंत्रणा सरकार विरोधात कौल जात असल्याचे थेट कधीही सांगत नाही. पण संकेत दिले जातात. ते मतदानोत्तर अनुकूल नसल्याने सत्ताधारी धास्तावले आहेत. यदा कदाचित रामटेकचा कौल विरोधात गेला तर काय करायचे यासाठी जो ‘ बी ‘ प्लॅन ‘ तयार करण्यात आला. त्यामुळे कॉंग्रेस नेते धास्तावले आहेत.

हेही वाचा : नागपूर: तीन महिन्यांत दोन लाखांवर हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई, पावणेपाच कोटी रुपयांचा दंड वसूल

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रश्मी बर्वे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून घेतलेल्या निर्णयांची तपासणी करून त्यात काही चुकीचे आहे का हे तपासले जात आहे. त्यांचे पती व कॉंग्रेस उमेदवार श्याम कुमार बर्वे यांच्या विरोधात निवडणूक पूर्व दाखल गुन्हे, संपत्तीची चौकशी केली जात आहे. निवडणूक निकाल जाहीर होण्यास एक महिन्यांपेक्षा अधिक कालावधी असतांना तपास यंत्रणांनी सुरू केलेल्या हालचालींमुळे कॉंग्रेस नेते सावध झाले आहे. असे असले तरी शक्तीशाली महायुतीने निकाल जाहीर होण्यापूर्वी पराभव मान्य केला का? असा प्रश्न या निमित्ताने राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is plan b of bjp leader devendra fadnavis for ramtek lok sabha seat cwb 76 css