नागपूर : रसाळ संत्री आणि तर्री पोहा यापेक्षा वेगळी नागपूरची ओळख सांगायची झाल्यास देशातील मारबत आणि बडग्याची मिरवणूक निघणारे एकमेव शहर.

राज्य विकास पर्यटन मंडळाने मान्यता दिलेल्या या मिरवणुकीची शहराने वर्षानुवर्षे परंपरा जपली आहे. त्यामुळे तान्हा पोळ्याच्या दिवशी नागपुरात निघणाऱ्या मारबत मिरवणुकीसाठी नागपूर हे शहर जगात ओळखले जाते. या मारबत मिरवणुकीत काळी व पिवळी मारबतीसह राजकीय नेते आणि सध्याच्या सामाजिक व राजकीय घडामोडीवर बडगे तयार केले जात असल्यामुळे या बडग्याचे मिरवणुकीत विशेष आकर्षण असते. हे बडगे का तयार करतात, चला तर जाणून घेऊया या बडग्यांचा इतिहास.

Pimpri, Ganesh utsav, police deployed,
पिंपरी : गणेशोत्सवासाठी तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त; ध्वनी पातळी नियंत्रित ठेवण्याच्या सूचना
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
travelers face difficulties as st workers strike continue
ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाला व्यापक स्वरुप, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची गैरसोय!
Nashik compensation land, Farmers Action Committee Nashik,
नाशिक : जागेचा मोबदला न मिळाल्यास रस्त्यांवर नांगर – मनपा आयुक्तांना शेतकरी कृती समितीचा इशारा
gym trainer, Kalyan, bandhara,
कल्याणमधील जीम ट्रेनर तरुण शहापूरजवळील बंधाऱ्यात बेपत्ता
Replicas of forts and temples are preferred abroad for Ganeshotsav decorations
गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी गड, किल्ले, मंदिरांच्या प्रतिकृतींना परदेशात पसंती
Laborer murdered, Solapur, Laborer,
सोलापूर : दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मजुराचा खून
potholes roads Mumbai, Mumbai,
मुंबईतील रस्त्यावर आतापर्यंत १६ हजार खड्डे बुजवले, गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी पालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला

हेही वाचा – शिंदे सरकार ६२ हजार सरकारी शाळा खासगी कंपन्यांना देणार, बाह्ययंत्रणेकडून कंत्राटी भरतीनंतर आता शिक्षणाचेही खासगीकरण

भोसले राजघराण्यातील बकाबाई या महिलेने इंग्रजांसोबत हात मिळवणी केली होती. तिच्या पतीने याला विरोध केला नव्हता. बकाबाईचा निषेध म्हणून काळी मारबत काढली जात असताना तिच्या पतीच्या नावाने बडगे तयार करून त्या पुतळ्याची मिरवणूक काढून निषेध केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत देशभरातील विविध घटनांवर आणि राजकीय नेत्यांवर बडगे तयार करत निषेध केला जातो.

हेही वाचा – नागपुरात उड्डाण पुलांवरील सुसाट वाहनांना आवरा! सततच्या अपघातांमुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

गेल्या काही वर्षांत नक्षलवादी, भ्रष्टाचार करणारा बडग्या, महापालिकेवर टीका करणारा, सरकारवर टीका करणारा, डिझेल पेट्रोल दरवाढीसह महागाईवर भाष्य करणारे बडगे तयार करण्यात आले आहे. मध्य नागपुरातील लालगंज, मस्कासाथ, जागनाथ बुधवारी, मासुरकर चौक, नाईक तलाव या भागात हे बडगे तयार केला जातात. यावर्षी विविध विषयांवर बडगे तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून ते कुठल्या विषयावर याबाबत उत्सुकता लागली आहे.