नागपूर: केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यावर मागच्या वर्षी सोन्याचे दर घसरले होते. पंरतु यंदा मात्र सोन्याच्या दरात प्रथम वाढ झाली. त्यानंतर अर्थसंकल्पाच्या तीन दिवसांनी व आठवड्याच्या पहिल्या दिवशी नागपुरात सराफा बाजार उघडल्यावर सोन्याचे दर प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी ८२ हजार ४०० रुपये नोंदवण्यात आले होते. या दरात चारच तासात बदल बघायला मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकत देशात सत्ता स्थापन केली. मोदी यांच्या तिसऱ्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प शनिवारी (१ फेब्रुवारी २०५) सादर झाला . या दिवशी नागपुरात बाजार उघडल्यावर प्रथम सोन्याचे दर घसरले. परंतु काही वेळाने दोन टप्यात सोन्याचे दर वाढले. दुपारी २.३० वाजता सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ८२ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७६ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६४ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५३ हजार ८०० रुपये नोंदवले गेले.

दरम्यान नागपुरात आठवड्याच्या पहिल्या दिवशी ३ फेब्रुवारी २०२५ रोजी सराफा बाजार उघडल्यावर सकाळी १० वाजता सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ८२ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७६ हजार ६०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६४ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५३ हजार ६०० रुपये नोंदवले गेले. परंतु चार तासांनी दुपारी २ वाजता या दरांमध्ये बदल होऊन ते वाढले. यावेळी सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ८२ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७६ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६४ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५३ हजार ८०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे लग्नाची धामधूम असतांना दरवाढीने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान सराफा व्यवसायिकांकडून मात्र हे दर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला व आता सोने- चांदीमधील गुंतवणूक फायद्याचा असल्याचा दावा केला जात आहे.

चांदीच्या दरातही बदल…

नागपुरातील सराफा बाजारात अर्थसंकल्पाच्या दिवशी १ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता चांदीचे दर प्रति किलो ९४ हजार रुपये नोंदवण्यात आले होते. परंतु सोमवारी (३ फेब्रुवारी २०२५) आठवड्याच्या पहिल्या दिवशी सराफा बाजार उघडल्यावर सकाळी १० वाजता हे दर ९३ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. परंतु चार तासांनी २ वाजता मात्र दर वाढून ९४ हजार रुपयांवर पोहचले.