नागपूर : देशात दरवर्षी ११ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय वन शहीद दिन पाळला जातो. भारतातील वन्यजीव, जंगले आणि जंगलांचे रक्षण करण्यासाठी प्राण गमावलेल्या कामगारांचे स्मरण आणि सन्मान करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. या दिवशी देशभरातील वनक्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये वन कर्मचाऱ्यांच्या योगदानाला महत्त्व दिले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

११ सप्टेंबर १७३० साली भारतात ‘खेजर्ली हत्याकांड’ ही एक ऐतिहासिक घटना घडली. या दिवशी जोधपूर किल्ला बांधताना चुनखडी आणि लाकडाची गरज होती, म्हणून दिवाण गिरधरदास भंडारी यांनी त्यांच्या सैनिकांना जंगलातून लाकूड आणण्याचा आदेश दिला. सैनिक झाडे तोडण्यासाठी पुढे सरसावले, पण अमृता देवी बिश्नोई नावाच्या महिलेच्या नेतृत्वाखाली काही गावकरी त्यांच्या झाडांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्यासमोर उभे राहिले. खेजरीची झाडे आपल्यासाठी पवित्र आहेत आणि ती तोडू देणार नाहीत असे अमृताने सांगितले. यानंतर सैनिक संतप्त झाले आणि त्यांनी गावातील लोकांना ठार केले. यात अमृताच्या मुलासह ३५० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला.

हेही वाचा – नागपुरात प्रथमच ‘एसटी’ची महिला कर्मचारी उपोषणावर, विभाग नियंत्रकांवर आरोप काय?

हेही वाचा – सासरा हॉलमध्ये टीव्ही बघतो, नवरा कुत्रा बांधून ठेवत नाही म्हणून घटस्फोटासाठी आलेल्या २३ कुटूंबांचे मनोमिलन

जेव्हा राजाला ही घटना कळली तेव्हा त्याने ताबडतोब आपल्या सैनिकांना परत बोलावले आणि त्यांच्यासह विष्णोई समाजाच्या लोकांची माफी मागितली. यानंतर राजा महाराजा अभय सिंह यांनी बिश्नोई समाजाच्या गावांच्या आसपासच्या भागात झाडे तोडली जाणार नाहीत आणि प्राण्यांची हत्या केली जाणार नाही, अशी घोषणा केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the connection between forest martyrs day and jodhpur fort rgc 76 ssb