नागपूर :महाराष्ट्रात राज्य रेशन धान्य दुकान चालक संघटनेने नुकतेच त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. त्यातील एक मुद्या लक्षवेधी होता. तो म्हणजे ‘पॉस’ मशीनचा. ५ – जी च्या काळात या मशीनसाठी शासनाने दिलेली २-जी इंटरनेट सेवेचा. महाराष्ट्रामध्ये एकूण १५ हजार सरकारी स्वस्त धान्याची दकाने आहेत. २०१६-१७ पासून धान्य दुकानात पॉस मशीन लावण्यात आल्या. या यंत्रासाठी इंटरनेटची गरज असते.
ते २- जी नेट सेवेशी जोडण्यात आले. त्यामुळे वारंवार हॅंग होते. त्यामुळे राज्य शासनाने ५G वर चालणा-या मशीन स्वस्त धान्य दुकानदारांना द्यावे, अशी मागणी केली आहे राशन दुकानदारांना एक पोते धान्य विक्रीवर १५० रूपये कमिशन दिले जाते. ते ५००/- रू. करावे. वन नेशन वन कार्ड योजनेत सर्व लाभार्थ्यांना धान्य मिळावे, ए.पी.एल. केसरी कार्ड धारकांची संख्या ५६,३४,०९९ आहे. ते धान्यापासून वंचित आहे.