नागपूर: नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी पीक हानी, आणि घरांची पडझड यापोटी शासनाकडून मिळणारी मदत पंचनाम्यावर अवलंबून असते. जितक्या लवकर पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे जाईल तेवढी मदत लवकर मिळते. विद्यमान स्थितीत ही पद्धत इंग्रजकालीन आणि वेळखाऊ आहे. तिला डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडून नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी ई- पंचनामा ही नवी पध्दत विकसित केली. त्यामुळे झटपट पंचनामे होऊन शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई मिळेल, असा दावा केला जात आहे.

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वेळेत, अचूक आणि गतीने पंचनामे होण्यासाठी नागपूर विभागात प्रथमच प्रायोगिक तत्वावर ‘ई-पंचनामे’ पद्धती राबविण्यात येत आहे. देशात व राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे बिदरी यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा… वडेट्टीवारांची ‘पदोन्नती’ पटोलेंसाठी धोक्याची घंटा? प्रदेशाध्यक्षपद मराठवाड्याकडे जाणार असल्याची चर्चा

ई-पंचनाम्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता स्वत: तलाठी शेतकऱ्याच्या बांधावर जातात. तेथील छायाचित्र घेवून अपलोड करतात. ही माहिती ई-पीक पाहणीच्या माहितीसोबत पडताळणी करून बघितली जाते. त्यानंतर ही माहिती राज्यशासनाकडे गेल्यावरशासनाने जाहीर कलेली मदत शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट जमा केली जाते, असे बिदरी यांनी सांगितले.

Story img Loader