लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. त्यांच्यावर कर्ज देखील आहे. विविध मार्गाने त्यांना उत्पन्न प्राप्त झाले आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात महायुतीचे भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांनी बुधवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीचे विवरण दिले आहे. अनुप धोत्रे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे २ कोटी ६१ लाख ३४ हजार ८४५ रुपये, पत्नीकडे १ कोटी ९९ लाख ०७ हजार ४२९ रुपये, हिंदू अविभक्त कुटुंबाकडे १ कोटी २७ लाख ७२ हजार ३८८ रुपये, तीन मुलांच्या नावावर २५ लाख ५८ हजार ३०० रुपये अशी एकूण ६ कोटी १३ लाख ७२ हजार ९६२ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. एकूण स्थावर मालमत्ता ४ कोटी ७८ लाख ८७ हजार रुपयांची आहे. यापैकी स्वत: अनुप धोत्रे यांच्या नावावर ४ कोटी ३ लाख २७ हजार रुपयांची मालमत्ता आहे.

आणखी वाचा-VIDEO: आर्चीच्या बछड्यांची ‘मस्ती की पाठशाला’, टिपेश्वरच्या जंगलातील दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद

त्यामध्ये स्वसंपादित केलेली २ कोटी ४७ लाख ७१ हजार, तर वारसाहक्काने १ कोटी ५५ लाख ५६ हजार रुपयांची मिळाली आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर ७५ लाख ६० हजार रुपयांची मालमत्ता आहे. अनुप धोत्रे यांच्यावर २ कोटी ३५ लाख २५ हजार १६९ रुपये, पत्नीच्या नावावर ६२ लाख ३० हजार ८१६ व हिंदू अविभक्त कुटुंबावर ७४ लाख ४५ हजार ६५६ असे एकूण ३ कोटी ७२ लाख ०१ हजार ६४१ रुपयांचे कर्ज आहे. कृषी, उद्योग व व्यवसाय त्यांच्या उत्पन्नाचे मार्ग आहेत. अनुप धोत्रे यांच्या नावावर दोन दुचाकी, एक ट्रॅक्टर, पत्नीच्या नावार कार व ट्रॅक्टर आहे. अनुप धोत्रे व त्यांच्या कुटुंबाकडे ८१५ ग्रॅम सोने आहे. अनुप धोत्रेंकडे ३६ एकर २६ गुंठे, तर पत्नीच्या नावावर १० एकर शेतजमीन आहे. त्यांच्याकडे शहरात विविध ठिकाणी प्लॉट असून पत्नीचे ग्वाल्हेर जिल्ह्यात प्लॉट आहेत.

आणखी वाचा-“तोडीबाज म्‍हणून बच्चू कडूंची ओळख, त्‍यांनी…”, आमदार रवी राणा यांचा इशारा

आंदोलनाचा गुन्हा

भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्यावर शहर कोतवाली पोलीस ठाण्यात पक्षाच्या आंदोलनादरम्यान कलम ३७ अन्वये प्रतिबंधात्मक आदेशाचा गुन्हा दाखल आहे.