नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा मोठा गट भाजपच्या माध्यमातून शिंदे सरकारमध्ये सहभागी झाला.दोन्ही गटाचे मेळावे मुंबईत झाले. अजित पवारांचे भाषण आक्रमक होते तर शरद पवार यांनी सयंमीपणे भूमिका मांडली. शरद पवार यांच्या भाषणात आलेला स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलनाचा उल्लेख होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाषणाचा शेवट त्यांनी कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्या ‘ उष:काल होता होता काळरात्र झाली,अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली ‘ या कवितेच्या ओळीने केला. सुरेश भट हे सुद्धा वैदर्भीय कवी. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत उलथापालथीच्या काळात पवार यांना झालेली विदर्भाची आठवण व त्याचे राजकीय संदर्भ याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.पवार यांच्या भाषणातील स्वतंत्र विदर्भ राज्य मागणीचा उल्लेख हा भाजप आणि विशेषतः या पक्षाचे नेते देवेश फडणवीस यांना टोला हाणणारा तसेच भाजप नेत्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा नसतो हे सांगणारा होता.यासाठी त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य मागणीच्या आंदोलनांचे उदाहरण दिले. स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

हेही वाचा >>>नवीन विद्यापीठ व्यावहारिकदृष्ट्या अयोग्य? अपुऱ्या निधीमुळे अमरावती विद्यापीठाचेच कार्य प्रभावित

त्यानंतर केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असूनही विदर्भ राज्य झाले नाही आणि फडणवीस यांचे लग्न होऊन अनेक वर्षे झाली. भाजपवर विश्वास ठेवून त्यांना पाठिंबा देणा-यांची ही अवस्था होऊ शकते, हे पवार यांना सांगायचे होते. सुरेश भटांच्या कवितेचा उपयोग त्यांनी कार्यकर्त्यांना नव्या लढाईसाठी तयार रहा हे सांगण्यासाठी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the meaning of vidarbha state demand suresh bhat poem sharad pawar that speech amy cwb 76 amy
Show comments