लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर : राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा देवेंद्र फडणवीस हे नागपूरकर आहेत आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासह इतर सार्वत्रिक निवडणुकांचे व्यवस्थापन करणाऱ्या राज निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदीही नागपूरमध्ये शिक्षण घेणारे आणि त्या अर्थाने नागपूरकर असणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची नियुक्ती झाली आहे. एका अर्थाने हा नागपूरचा बहुमानच ठरावा.

दिनेश वाघमारे यांचा जन्म नागपुरातील नसला तरी त्यांचे शिक्षण मात्र याच शहरात झाले. दिनेश वाघमारे यांचे वडील सैन्यात होते. त्यांची सेवा पुणे येथे असल्याने तेथेच दिनेश वाघमारे यांचा जन्म झाला. वडिलांची नागपूर जिल्हातील कामठी येथे बदली झाली. त्यानंतर वाघमारे कुटुंब कामठीत स्थानांतरित झाले. यावेळी दिनेश वाघमारे यांचे वय केवळ ५ वर्षे होते. नागपुरात वाघमारे यांचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले. सातवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण वर्धेतील स्वावलंबी विद्यालय येथे घेतले. त्यानंतर अकरावी आणि बारावीचे शिक्षण त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालयात घेतले. तर बी. ई. (इलेक्ट्रॉनिक्स) नागपुरातील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतून (व्हीएनआयटी) केले. पुढील उच्च शिक्षणासाठी ते नागपूर बाहेर पडले.

आणखी वाचा-भाजप मोर्चेबांधणीत व्यस्त, काँग्रेस सुस्तच! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पूर्वतयारी

एम. टेक. (कॉम्पुटर सायन्स) आय. आय. टी. खरगपूर येथून घेतले. त्यानंतर त्यांनी इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड विद्यापीठातून त्यांनी विकास आणि प्रकल्प नियोजन या विषयातून एम. एस्सी. केले. वाघमारे शासकीय सेवेत रूजू झाल्यानंतर त्यांचा नागपूरशी संबध होताच.वाघमारे हे नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती होते.तत्पूर्वी रत्नागिरी येथील सहाय्यक जिल्हाधिकारी ते वैद्यकीय शिक्षण खात्यातील अपर मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई अशा विविध पदावर आजपर्यंत सेवा दिली आहे. ते सध्या वैद्यकीय शिक्षण खात्याची जबाबदारी बघत आहे. त्यांनी देश-विदेशात अनेक महत्वाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्याचा लाभ राज्यातील विविध पदावर सेवा देताना राज्याला झाला आहे.

आणखी वाचा- वन पर्यटनात नियम मोडल्यास २५ हजारांपर्यंतचा दंड

आजपर्यंतची सेवा

  • अपर मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग- सप्टेंबर २०२३- आतापर्यंत
  • प्रधान सचिव, गृह विभाग (अपील आणि सुरक्षा)- मे २०२३-ऑक्टोबर २०२३
  • प्रधान सचिव, ऊर्जा विभाग- फेब्रुवारी २०२१- मे २०२३
  • अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महापारेषण- फेब्रुवारी २०२०- मे २०२३
  • प्रधान सचिव, सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभाग- जानेवारी २०१९ ते फेब्रुवारी २०२०
  • सचिव, सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभाग- एप्रिल २०१७ ते डिसेंबर २०१८
  • आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका- मे- २०१६ ते डिसेंबर २०१८
  • आयुक्त, नवी मुंबई महापालिका- जून २०१५ ते मे २०१६
  • व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी-उद्योग विकास महामंडळ, बृहन्मुंबई- सप्टें. २०१२ ते जानेवारी २०१५
  • सचिव, सामाजिक न्याय आणि अधिकारिता कल्याण विभाग (एस. सी. आणि मागासवर्गीय विभाग)- जानेवारी २०११ ते ऑगस्ट २०१२
  • व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ, नागपूर- जानेवारी २०११ ते जानेवारी २०११
  • विभागीय आयुक्त, जमिन महसूल विभाग, अमरावती- जानेवारी २०१० ते ऑक्टोंबर २०१०
  • सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर- जुलै २००९ ते जानेवारी २०१०
  • अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नागपूर- जानेवारी २००९ ते जुलै २००९
  • व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र लघु उद्योग विकास कॉर्पोरेशन लिमिटेड- सप्टेंबर २००७ ते जानेवारी २००९
  • अध्यक्ष, नागपूर सुधार प्रन्यास- मे २००५ ते सप्टेंबर २००६
  • बुलढाणा, जिल्हाधिकारी- डिसेंबर २००१ ते मे २००५
  • मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ जिल्हा परिषद- मे १९९९ ते डिसेंबर २००१