वर्धा : पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील पोलीस कर्मचाऱ्यांना खबरदार केले आहे. सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. या उत्सवी माहोलमध्ये डिजेचा ताल भल्याभल्यांना नाचायला भाग पाडतो. त्यास पोलीस कसे अपवाद ठरणार. म्हणून पोलिसांनी गणवेशात असताना ठेका धरू नये. खाकीचे भान ठेवावे. बेधुंद होत पोलीस नाचत असल्याचे व्हिडिओ नेहमी पाहण्यात येतात. या अनुषंगाने तंबी देण्यात आली आहे. म्हणून गणवेशात नाचत असल्याचे व्हिडीओ व्हायरल करण्यास मनाई करण्याचे पत्रक काढण्यात आले आहे.
हेही वाचा – झटपट नोकरीच्या आशेने विद्यार्थ्यांचा ‘आयटीआय’कडे कल
तसेच सोशल मीडियावर बेजबाबदार वागता कामा नये. दक्ष वर्तन असावे. अन्यथा नागरी सेवा वर्तणूक नियमांचे पालन न केल्याचा ठपका ठेवून कारवाई केली जाणार आहे. कारण मोजक्या अश्या काही बेजबाबदार वागणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांच्यामुळे पोलीस खात्यास बट्टा लागत असल्याचे निरीक्षण आहे.