नागपूर: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर नागपूरसह देशात प्रथम सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. परंतु त्यानंतर कधी दर वाढले, तर कधी कमी होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान श्रीकृष्ण जन्माष्टमीला  सोमवारी (२६ ऑगस्ट) नागपुरात बाजार उघडल्यापासून सोन्याच्या दरात वाढ नोंदवली जात आहे. त्यामुळे दागिने खरेदीसाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.

नागपुरसह राज्यात अनेक कुटुंबामध्ये श्रीकृष्ण जयंतीनिमित्त घरात श्रीकृष्णाची मूर्ती आणली जाते. त्यानंतर या मूर्तीची पुजा करत घरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नागपुरातही श्रीकृष्णाचे सोमवारी अनेक घरात आगमन झाल्यावर  जन्मोत्सवाचे कार्यक्रम होतात. त्यात काही कुटुंबात सोने- चांदीच्या मूर्तीची पाळण्यात टाकून पूजा होते. त्यामुळे सराफा व्यवसायिकांकडे या मूर्तींना मागणी असते.

Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
gold price increased
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने वाढवली चिंता… हे आहे आजचे दर…
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’
Gold crown stolen from Pune, Zaveri Bazar, Pune,
पुण्यातून चोरलेल्या सोन्याच्या मुकुटाची मुंबईतील झवेरी बाजारात विक्री
rbi monetary policy rbi keeps repo rates unchanged reserve bank predicts rising inflation
व्याज दरकपात नाहीच!‘जीडीपी’वाढीच्या अपेक्षांना कात्री; महागाईचा ताप चढण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज

हेही वाचा >>>चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे हल्ले थांबेनात, पुन्हा एक शेतकरी…

दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात ३ ऑगस्टला सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७० हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६५ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५५ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार ९०० रुपये होते. हे दर ८ ऑगस्टला २४ कॅरेटसाठी ६९ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६४ हजार ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५४ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार होते. आता सोन्याचे दर वाढत असून २६ ऑगस्टला बाजार उघडल्यावर सकाळी १०.३० वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७२ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ६७ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ५६ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ८०० रुपये होते. हे दर दुपारी २.३० वाजता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७२ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६७ हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५६ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ००० रुपये होते. त्यामुळे नागपुरात श्रीकृष्ण जयंतीलाही सोन्याचे दर वाढतांना दिसत आहे. त्यातच हल्ली सोन्याचे दर वाढले असले तरी पूढे हे दर आणखी वाढण्याचा अंकाज सराफा व्यवसायिकांकडून वर्तवला जात आहे.

चांदीच्या दरातही वाढ

नागपुरातील सराफा बाजारात २६ ऑगस्टला सकाळी बाजार उघडल्यावर सकाळी १०.३० वाजता चांदीचे दर ८५ हजार ६०० रुपये प्रति किलो नोंदवले गेले. हे दर दुपारी २.३० वाजता ८६ हजार ८०० रुपये होते. त्यामुळे चांदीच्या दरात प्रति किलो १ हजार २०० रुपये प्रति किलो वाढ झाली आहे.

Story img Loader