नागपूर : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जोर धरलेल्या पावसाने रविवारी राज्यातील काही भागांतून काढता पाय घेतला, पण तरीही हा पाऊस पुढील तीन ते चार दिवसांसाठी कायम असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. पावसाचे प्रमाण मात्र कमीजास्त राहणार आहे.
हेही वाचा – चंद्रपूर जिल्हा कारागृहामध्ये तृतीयपंथी बंद्यांकरीता स्वतंत्र व्यवस्था
हेही वाचा – ‘नाहीतर तो व्हिडीओ..’, तरुणीला धमकी देत दोघांनी शरीर सुखाची केली मागणी
ऑगस्ट महिन्यापासून दडी मारून बसलेला पाऊस हवामान खात्याच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात बरसण्यास सुरुवात झाली आणि अनेकजण सुखावले. आठ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या पावसाने पुढील काही दिवसांत राज्यातील बऱ्याच भागांमध्ये जोर धरला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांसाठी असेच पर्जन्यमान राहणार असून राज्यातील कोकण, पालघर, ठाणे भागात मुसळधार सरींची हजेरी असणार आहे.