नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्नित सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील सोनोग्राफी यंत्र तांत्रिक कारणाने बंद पडले. त्यामुळे येथील महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णांची तपासणी खोळंबल्याने हे रुग्ण योजनेच्या मंजुरीसाठी ताटकळत असल्याची माहिती आहे.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील काही शस्त्रक्रियेसाठी संबंधित रुग्णांची सोनोग्राफी तपासणी आवश्यक आहे. या तपासणीचा अहवाल महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णांना केस मंजुरीसाठी ‘फाईल’मध्ये जोडावा लागतो. त्याला कालांतराने मंजुरी दिली जाते. त्यानंतरच रुग्णाची शस्त्रक्रिया वा प्रक्रिया केली जाते. मात्र, ‘सुपरस्पेशालिटी’तील सोनोग्राफी यंत्र बंद पडल्याने येथे या तपासण्या खोळंबल्या आहे. तसेच महात्मा फुले योजनेतील रुग्णांच्या तपासणी अहवालाअभावी ‘फाईल’च संबंधित विभागात जमा करता येत नाही. त्यामुळे या रुग्णांच्याही शस्त्रक्रिया अडकून पडल्या आहे.

6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
fraud of One lakh with CME professor in the name of courier
कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?
Most robotic surgeries performed by Tata hospital in shortest time
टाटा रुग्णालयाकडून कमी कालावधीत सर्वाधिक रोबोटिक शस्त्रक्रिया

हेही वाचा – जमिनीच्या आठ लाखांवर मिळकत पत्रिका; देशात महाराष्ट्र चौथ्या स्थानावर

रुग्णालय प्रशासनाने अधिष्ठात्यांना या यंत्रातील बिघाडाची माहिती दिल्यावर तातडीने दुरुस्तीच्या सूचना संबंधित कंपनीला देण्यात आल्या. सोबत या तपासणीसाठी रुग्णांना मेडिकलच्या क्ष-किरणशास्त्र विभागात पाठवण्याचीही सूचना करण्यात आली. परंतु ‘सुपर’मधील बऱ्याच डॉक्टरांना हे रुग्ण सोनोग्राफीसाठी सुपरला पाठवण्याची माहिती नाही. त्यामुळे विविध शस्त्रक्रिया वा प्रक्रियेसाठी सुपरस्पेशालीटी रुग्णालयात दाखल महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णांना योजनेच्या मंजुरीसाठी ताटकळत रहावे लागत आहे.

हेही वाचा – नागपूर: “लेस्बियन असल्याने सुखी संसार करू शकणार नाही, समाजही विरोध करेल,” या विवंचनेतून समलैंगिक तरुणीची आत्महत्या

‘सुपर’च्या प्रशासनाने हे यंत्र मंगळवारी दुरुस्ती होणार असल्याचे सांगत मेडिकलला रुग्णांची सोनोग्राफी होत असल्याचे सांगितले. मेडिकल रुग्णालयात या रुग्णांच्या तपासणीनंतर त्यांना मेडिकलच्या ‘लेटरहेड’वर अहवाल मिळत नसल्याने महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील साध्या कागदावरील अहवालाच्या ‘फाईल’ला मंजुरी मिळणार कशी, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.