लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वर्धा : शेती, आमदारकीचे पेन्शन, शेअर्स, बचत या माध्यमातून राष्ट्रवादी पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांची संपत्ती जमली आहे. त्यांचे मुंबईत व्हर्सोवा व वरळी तसेच नागपूर येथे फ्लॅट्स आहेत. तसेच आर्वीत निवासस्थान असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यांची मालमत्ता ३ कोटी ९५ लक्ष रुपयाची तर पत्नी मयुरा काळे यांची ३ कोटी ९ लक्ष रुपयाची आहे. पत्नीच्या नावे २ कोटी ५८ लक्ष रुपयांचे कर्ज आहे. तर स्वतः अमर काळे यांच्यावर ३६ लक्ष रुपयांचे कर्ज आहे.

आणखी वाचा-“ही गद्दार विरुद्ध खुद्दार, अशी लढाई”, सुषमा अंधारे कडाडल्या; नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पती पत्नीच्या नावे वाठोडा व मोहम्मदपूर येथे एकूण १४ एकर शेती आहे. बोलेरो, मारोती कार, ६५० ग्रॅम दागिने, दोघांच्या मिळून १६ विविध कंपनीत म्युच्युअल फंड, पेन्शन प्लॅन व तत्सम गुंतवणूकी आहेत.आयुष्मान सर्जिकल कंपनीत शेअर्स तसेच आर्वीत पाच भूखंड संपत्तीचा भाग आहे. मुलं अजित व अजिंक्य यांच्या नावे मालमत्ता नाही. घरभाडे व पत्नीच्या व्यवसायातून उत्पन्न असल्याचे नमूद आहे. त्यांच्यावर कोणतेही गुन्हे दाखल झालेले नाही.ते बी ए. द्वितीय पर्यंत शिकलेत.