नागपूर : मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा, खाजगी विनाअनुदानित व खाजगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये (अल्पसंख्याक शाळा वगळून) २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत ७३ हजार ६१२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, अद्याप ३१ हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला २३ ते ३१ जुलै या कालावधीत प्रवेशासाठी संधी दिल्यानंतर आणखी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दोन फेऱ्या राबवण्यात आल्या. त्यानंतरही जागा रिक्त असल्याने आता अर्जदारांना संधी कशी मिळेल, त्यासाठी काय कराल याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशी राहणार तिसरी फेरी

प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा राज्यातील ९ हजार २१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार २४२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी दाखल झालेल्या २ लाख ४२ हजार ५१६ अर्जांतून ९३ हजार ९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रतीक्षा यादीत ७१ हजार २७६ विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्रतीक्षा यादीतील तिसऱ्या फेरीतील बालकांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांनी १२ सप्टेंबरपर्यंत तालुका पडताळणी समितीकडे संपूर्ण कागदपत्रासह प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ सप्टेंबरला नागपुरात! वंदे भारत एक्सप्रेला…

न्यायालयाने खासगी शाळांना सुनावले

 आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा दिलेला आदेश हा केवळ राज्य शिक्षण मंडळालाच नाही, तर सगळ्या शिक्षण मंडळांना लागू आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, या शिक्षण मंडळांशी संलग्न खासगी शाळांनी सध्याच्या विद्यार्थीसंख्येपेक्षा अतिरिक्त प्रवेश देण्यास हरकत नाही, असे नमूद केले. तसेच परवानगी मिळत नसल्याची सबबी सांगू नका, असेही न्यायालयाने खासगी शाळांना सुनावले.

हेही वाचा >>>गडचिरोली : पुरस्थिती! मुसळधार पावसामुळे भामरागडचा संपर्क तुटला, ५० कुटुंबे…

पालकांनो याकडे दुर्लक्ष करू नका

– प्रतीक्षा यादी २० जुलै रोजी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

– पालकांनी केवळ ‘एसएमएस’वर अवलंबून राहू नये.

– आरटीई संकेतस्थळावरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या बालकाचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पहावी.

– वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सूचनांचे पालन करावे.

– कोणत्याही आमिषाला व प्रलोभनाला बळी पडू नय

– प्रवेशासाठी बनावट कागदपत्र तालुका पडताळणी समितीकडे सादर करू नये.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What to do if dont get admission even after applying for rte nagpur news dag 87 amy