बीड प्रकरण आणि त्या निमित्ताने झालेल्या आरोप प्रत्यारोपात नाव आल्याने अभिनेत्री प्राजक्ता माळी अस्वस्थ झाल्या.त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. ही भेट सध्या चर्चेत आहे. मात्र ही त्यांची पहिली भेट नाही. यापूर्वी २०२३ मध्ये प्राजक्ता माळी नागपूरमध्ये संघाच्या कार्यक्रमात भेटल्या होत्या. मात्र ती सदिच्छा भेट होती.
सध्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्या प्रकरणावरुन राजकारण तापले आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण विधानसभेत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी लावून धरले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे व त्यांचा कट्टर समर्थक वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे. धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या बीडमधील एका कार्यक्रमाचा उल्लेख केला आणि हत्येच्या प्रकरणावरील चर्चेची दीशा दुसरीकडे वळली. प्राजक्ता माळी यांनी धस यांच्या माफीची मागणी केली. पत्रकार परिषद घेऊन आपल्याला जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे असा दावा केला आणि लेगेच त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी राहीली बाजूला प्राजक्ता माळी प्रकरण माध्यमांवर चर्चेत आले. पण फडणवीस – प्राजक्ता माळी यांच्यातील ही भेट पहिली नाही. यापूर्वी नागपूरमध्ये त्यांची भेट झाली होती .
हेही वाचा >>>३ जानेवारीला पृथ्वी ते सूर्याचे अंतर राहणार सर्वांत कमी !
संघाच्या कार्यक्रमात भेट
२०२३ मध्ये नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यात प्राजक्ता माळी सहभागी झाल्या होत्या. या मेळाव्याला फडणवीस उपस्थित होते. तेथे प्राजक्ता माळी यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती.