नागपूर : देशातील हवामानात सध्या वेगाने बदल होत आहेत. अशातच आता भारतीय हवामान खात्याने थंडी आणि पावसाबाबत माहिती दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या गुरुवारपर्यंत म्हणजेच ११ जानेवारीपर्यंत पाऊस कायम राहणार आहे. तर तापमानातही बदल होताना दिसून येणार आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका अधिक होता. येथेही तापमानात बदल होताना दिसून येणार आहेत. तापमानात घट होणार असून थंडीचा जोर ओसरताना दिसून येईल. उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातदेखील वातावरणात बदल होणार आहेत. नागरिकांना कोरड्या वातावरणाचा अनुभव येईल. दक्षिण भारतात मागील २४ तासांत पावसाची हजेरी पाहायला मिळाली. तर देशाच्या काही भागांत आज आणि उद्या पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – बुलढाणा : “न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास”, आमदार संजय रायमुलकर म्हणतात, “निकाल आमच्याच बाजूने…”

दक्षिण भारतात पाऊस तर उत्तर भारतात थंडी असे विरोधाभासी वातावरण देशात दिसून येत आहे. राज्यातील काही भागांत मंगळवारी पावसाने हजेरी लावली. तर काही भागात आभाळी वातावरण होते. आजही ते कायम आहे. कोकणातील काही जिल्ह्यांत मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर नाशिक, जळगाव, पुणे, सातारा या जिल्ह्यातसुद्धा रिमझिम पावसाने हजेरी लावली.

हेही वाचा – नागपूर : २०० कलाकार, उंट, घोडे आणि बरेच काही…

आज, बुधवारी राज्याच्या उपराजधानीत सकाळपासून ढगाळ वातावरण कायम आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत ढगाळी वातावरण तर काही जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाजदेखील हवामान खात्याने दिला आहे.

Story img Loader