नागपूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या विविध घटना आणि त्यादरम्यानच समोर येणारी सायबर क्राईमची प्रकरणे पाहता ऑनलाईन व्यवहार, सोशल मीडिया अकाउंट अशा माध्यमांमध्ये सतर्क राहण्याचीच गरज आहे. शिवाय कोणताही अनुचित प्रकार घडत असल्याचे लक्षात येताच प्राथमिक स्तरावर तोडगा न निघाल्यास तातडीने संबंधित यंत्रणांकडे याची नोंद करणे महत्त्वाचे आहे.
आपले कुटुंब किंवा मित्रपरिवार यांपैकी कोणालाही एसएमएस वेरिफिकेशन कोड न सांगण्याचा सल्ला व्हॉट्सॲपकडून देण्यात आला आहे. तुम्ही यापूर्वीच असे केल्यास तातडीने अकाउंट रिकव्हर करण्याची पावले उचलली जाण्याची गरज आहे. ज्यामुळे तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट जर हॅक करण्यात आले असेल तर पुढील उपाय करा.
हेही वाचा – बुलढाणा: वडाळा येथे दरोडा; दागिन्यासह रोख लंपास, महिला जखमी
अकउंट हॅक झाल्याचे कळताच काय करावे?
अकाउंटचा कोड वगैरे माहिती अनपेक्षित व्यक्तीपर्यंत पोहोचून अकाउंटवर इतर कोणाचे नियंत्रण आल्याचे लक्षात येताच मित्रपरिवार, तुमच्या संपर्कातील मंडळी यांना शक्य तितक्या लवकर याबाबतची माहिती द्या. पुढची पायरी म्हणजे तुमच्या दूरध्वनी क्रमांच्या अर्थात फोन नंबरच्या माध्यमातून व्हॉट्सॲपवर लॉगईन करा. ज्याअंतर्गत तुम्हाला ६ आकडे असणारा एक वेरिफिकेशन कोड एसएमएसच्या माध्यमातून तुमच्या फोन नंबरवर देण्यात येईल. हा कोड वापरून लॉगईन केल्यास तुमचे अकाउंट दुसरे कोणी वापरत असल्यास आपोआपच ते लॉगआऊट झालेले असेल.