लोकसत्ता टीम

नागपूर : देशभरात पावसाच्या परतीचे वेध लागण्याची वेळ आली असताना आता चक्रीवादळाची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गुजरातमध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक सक्रीय होण्याची शक्यता आहे आणि तो अधिक तीव्र होऊन चक्रीवादळात त्याचे रुपांतर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राजस्थानमध्येही वादळी प्रणाली अरबी समुद्राच्या दिशेने पुढे सरकत आहे. अनेक राज्यांमध्ये सध्या मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे.

Rain Maharashtra, Rain in Diwali, Rain,
फटाक्यांच्या मोसमात पावसाची आतषबाजी, महाराष्ट्रात पुन्हा…
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
La Nina, The rainy season, climate patterns, global phenomenon
विश्लेषण : ‘ला निना’चा पावसाळी मुहूर्त चुकला! आता कडाक्याच्या थंडीबरोबर गारपिटीचीही शक्यता?
share market down marathi news,
शेअर बाजारात दिवाळीपूर्वीच आतिषबाजी!
shetkari sanghatana
शेतकरी संघटनांची ऊसदर आंदोलने यंदा थंड ! आचारसंहितेमुळे निकालानंतर लढाईची तयारी
NCP Sharad Pawar or NCP Ajit Pawar will fight in Vadgaon Sheri and Hadapsar constituencies in pune
शहरातील ‘या’ मतदारसंघात होणार ‘घड्याळ’ विरुद्ध ‘तुतारी’ लढत!
cash seized Maval, Maval, Pimpri, Maval latest news, Maval cash news,
पिंपरी : खेड शिवापूरनंतर आता मावळमध्ये १७ लाख ७५ हजारांची रोकड जप्त
danger of Cyclone Dana Who gave this name and what is the meaning
‘दाना’ चक्रीवादळाचा धोका! कोणी दिले हे नाव, काय आहे अर्थ?

गुजरातमध्ये या पावसाने धुमाकूळ घातला असून वादळी पावसाचा इशारा या राज्याला देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. तर गुजरातसह केरळमध्येही पावसामुळे परिस्थिती बिघडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पावसाला परतीचे वेध लागेल अशी अपेक्षा असताना पावसाचा जोर वाढतच चालला आहे. त्यामुळे लवकर दाखल झालेला मान्सून उशिरा परतणार का, अशी चिन्हे सध्यातरी दिसून येत आहेत. एकीकडे गुजरातमध्ये पाऊस धुमाकूळ घालत असताना महाराष्ट्रात संमित्र पावसाची स्थिती दिसून येत आहे. गुजरातमध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे त्याठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. तर महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा ओसरला असल्याचे दिसून येत आहे.

आणखी वाचा-नागपूर : धरमपेठ ‘रस्त्या’वरील वादग्रस्त पबचा परवाना रद्द करा, त्रस्त नागरिकांची उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

हवामान खात्याने राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट दिला होता. मात्र, बऱ्याच ठिकाणी पावसाचा लपंडाव दिसून येत आहे. मुसळधार ते हलक्या स्वरुपाच्या पावसाचा इशारा असताना राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये कालपासून सूर्यनारायणाचे दर्शन होत आहे. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार सरींचा अंदाज असला तरी सध्यातरी स्थिती तशी नाही. असह्य होईल असे उन्हाचे चटके विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जाणवत असून दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान गुजरातमधील कमी दाबाचा पट्टा आणखी किती तीव्र होतो, यावर महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण अवलंबून असण्याचीही शक्यता आहे.

आणखी वाचा-शहरातील ५० ते ६० वर्षांपूर्वीचे पुतळे आजही…..

राज्यातील पश्चिम भागामध्ये घाटमााथ्यावरील क्षेत्रामध्ये पावसाची दमदार हजेरी राहणार असून, मध्य महाराष्ट्रापर्यंत पावसासाठी पूरक वातावकरण निर्मिती होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, असे असले तरीही गुजरातमधील कमी दाबाचा पट्टा आणखी किती तीव्र होतो यावर महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण अवलंबून राहील.