गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेडीगड्डा धरणग्रस्तांना योग्य मोबदला लवकरच देण्यात येईल, असे आश्वासन हिवाळी अधिवेशनादरम्यान दिले होते. परंतु सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न अद्याप मार्गी न लागल्याने त्यांना पुन्हा पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. त्यामुळे आम्ही आणखी कधीपर्यंत आंदोलन करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या परवानगीने तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडीगड्डा धरणासाठी सिरोंचा तालुक्यातील ३७३.८० हेक्टर जमीन तात्काळ अधिग्रहित करण्यात आली होती. यापैकी १३८.९१ हेक्टर जमिनीची भूसंपादन आणि मोबदला प्रक्रिया रखडली.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Mumbai zopu yojana loksatta news
घर मिळालेल्या झोपडीवासीयांच्या नावे पुन्हा पात्रता! घोटाळा उघड होऊन वर्षभरानंतरही कारवाई नाही

हेही वाचा – नागपूर : पतीच्या अनैतिक संबंधाने विस्कटलेला संसार पुन्हा रुळावर! भरोसा सेलच्या प्रयत्नांना यश

अनेकदा आंदोलन करून पाच वर्षांपासून धरणग्रस्तांना जमिनीचा योग्य मोबदला मिळालेला नाही. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ६९०० हेक्टर शेती बाधित झाली होती. अनेक गावे पाण्याखाली बुडाली. धरण बंधल्यापासून हा परिसर कायम पुराच्या छायेत असतो. मेडीगड्डा धरणाच्या उभारणीच्या वेळेस सिरोंचा तालुक्यातील धरण क्षेत्रात येणारी ३७३.८० हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली होती. त्यापैकी तात्काळ गरज असलेली २३४.९१ हेक्टर जमीन तेलंगणा सरकारे १०.५० लक्ष एकर प्रमाणे थेट खरेदी केली. त्यानंतर धरणाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. परंतु उर्वरित १३८.९१ हेक्टर अधिग्रहित जमिनीची भूसंपादन प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यासाठी या भागातील १२ गावातील शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदन दिले. तहसील कार्यालयासमोर आंदोलनदेखील केले. त्यावेळेस प्रशासनाने मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.

शेतकरी भूसंपादन प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून थेट खरेदी पद्धतीने मोबदला द्यावा यासाठी आग्रही आहे. परंतु प्रशासनस्तरावर सदर प्रक्रिया खोळंबली आहे. हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना योग्य मोबदला तेलंगणा सरकार नसेल देत, तर महाराष्ट्र सरकार देणार असे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.

हेही वाचा – अमरावती : वडिलांनी संतापून मोबाईल फोडला, १५ वर्षीय मुलीने रागाच्या भरात..

मेडिगड्डा धरणग्रस्तांच्या जमिनीचे भूसंपादन

२०१३ च्या कायद्यानुसार न करता थेट खरेदी पद्धतीने झाले पाहिजे. या मागणीसाठी आम्ही मागील पाच वर्षांपासून आंदोलन करीत आहोत. परंतु शासनाकडून आश्वासनांशिवाय काहीच प्राप्त झाले नाही. त्यामुळे आमच्यावर वारंवार आंदोलन करण्याची वेळ येत आहे. – राम रंगु, पीडित शेतकरी

Story img Loader