‘आनंदाचा शिधा’चा गुढीपाडव्याचा मुहूर्त हुकल्यावर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा मुहूर्त तरी यंत्रणा साधणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्याला शिधा मिळाला खरा पण लाखो लाभार्थ्यांना तो प्रत्यक्ष मिळालाच नाही. यामुळे ‘शिधा’ मिळाला पण ‘आनंद’ कधी मिळणार, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्याला ‘आनंदाचा शिधा’च्या ४ लाख ८३ हजार ६२२ किटस काही दिवसांपूर्वीच प्राप्त झाल्या आहे. वाहतुकदाराने या लाखो किट्स शासकीय गोदामात पोहोचत्या केल्या. मात्र जिल्ह्यांतर्गत वाटपाचे नियोजन पूर्णत: फसले. यामुळे गुढीपाडव्याला लाखो रेशनकार्ड धारकांना शिधाचा आनंद मिळालाच नाही! त्यानंतर वाटपासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा मुहूर्त ठरवण्यात आला. मात्र जिल्ह्यातील धान्य वाहतुकीचा उडालेला बोजवारा लक्षात घेतला तर १४ एप्रिलचा मुहूर्त साधणेदेखील शक्य नसल्याची चिन्हे आहे.

हेही वाचा >>>“महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेची भाजपाला धास्ती”; माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात…

विविध गोदामातून हा शिधा जिल्ह्यातील १५३७ रेशन दुकानापर्यंत पोहोचावा लागणार आहे. जिल्हाअंतर्गत वाहतुकीच्या हुकलेल्या नियोजनामुळे बहुतेक तालुक्यात रेशन दुकानांना पुरवठा करण्याचे काम मंद गतीने सुरू आहे. वानगीदाखल सांगायचे झाल्यास चिखली तालुक्यातील १७१ पैकी अत्यल्प रेशन दुकानाना शिधा मिळाला आहे. अशीच स्थिती बहुतेक तालुक्यांची आहे. यामुळे १४ एप्रिलपर्यंत ४ लाख ८३ हजार लाभार्थ्यांना शिधाचा आनंद मिळण्याची शक्यता मावळली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When will the beneficiaries get anand shidha scm 61 amy
Show comments