वाशिम : जिल्ह्यात अंदाजे १ हजार ७६ अंगणवाड्या असून यामधील बालकांसाठी पोषण आहार दिला जातो. मात्र मागील काही महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांनी संप पुकारल्याने आहार वाटप बंद असताना पालकांच्या मोबाईल फोनवर आहार वाटप केल्याचे मॅसेज प्राप्त होत असल्यामुळे पोषण आहार वाटपातील गोंधळ समोर येत असल्याने सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.
हेही वाचा – भुजबळ, वडेट्टीवार समाजाची दिशाभूल करत आहे, बबनराव तायवाडे यांचा आरोप
हेही वाचा – ७ फेब्रुवारीला चंद्रपुरात महामोर्चा, जातनिहाय जनगणना करण्याची मागणी
जिल्ह्यात विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका मागील काही महिन्यांपासून संपावर असल्यामुळे पोषण आहार वितरण राखडले आहे. अंगणवाड्यात शिकणाऱ्या बालकांचा पोषण आहार तीन महिन्यांपासून आलाच नसल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे मात्र पालकांच्या मोबाईलवर पोषण आहार दिला. असा संदेश शासनाकडून न चुकता दिला जात आहे. याबद्दल पालकांनी अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन अंगणवाडी सेविकांना पोषण आहार आलाय आमचा आम्हाला मिळाला नाही. अशी विचारना केली असता पोषण आहार अजून आलाच नाही. असे उत्तर दिले जात आहे. यामुळे अंगणवाडीतील बालकांच्या पोषण आहारवर कोण डल्ला मारतंय? असा प्रश्न पालकांसाह नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.