वर्धा : रामायणातील सीता हे प्रमुख स्री व्यक्तिमत्व. मात्र, सीतेचे एकमेव मंदिर भारतात तर दुसरे श्रीलंकेत आहे. जीर्ण अवस्थेत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात रावेर यागावी असलेल्या या सीता मंदिराकडे पहिले लक्ष गेले शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांचे. त्यामागची आख्यायिका त्यांनी प्रथम समजून घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामाने गर्भवती सीतेचा त्याग केल्यानंतर लक्ष्मणाने तिला याच परिसरात आणून सोडले होते. इथेच लव कुश यांचा जन्म झाला. या पुत्राच्या जन्मानंतर सीतेला गावकऱ्यांनी सोजी करण्यासाठी गहू दिले नाही. म्हणून या जमिनीत गहू पिकणार नाही,असा शाप सीतेने दिला व तो खरा ठरला असल्याची आख्यायिका आजही सांगितल्या जाते.

हेही वाचा – एक लाखापेक्षा जास्त शेतकरी कृषीपंपासाठी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत; महावितरणकडून सर्वाधिक जोडणी दिल्याचा दावा

उपेक्षा सहन करीत असलेले हे मंदिर पाहून शरद जोशी यांनी आवाहन केल्यावर महिला कार्यकर्त्यांनी देखण्या स्वरुपात या मंदिराची उभारणी केले. हे कार्य म्हणजे सीतेच्या सक्षम मातृत्वास नमन होय, असे संघटनेच्या सरोज काशीकर सांगतात. संसार दोघांचा असतो. रामाने नाते संपविले, मात्र सीतेने जबाबदारी स्वीकारली.

राजकुमारांचं व्यक्तिमत्व घडविले. समाजात वेगवेगळ्या विचारांच्या स्त्रिया असतात, मात्र आत्मभान व आत्मसन्मान जपण्यासाठी सीता नवमीचे आयोजन शेतकरी संघटनेतर्फे २९ एप्रिलला या ठिकाणी केल्या जाते. सीता सोहळा दुपारी एक वाजता होणार आहे. ज्या महिलांनी पती निधनानंतर किंवा घटस्फोटनंतर हिम्मत न हरता समाज व्यवस्थेशी संघर्ष करीत आपल्या पाल्यांना लवकुशाप्रमाणे आत्मनिर्भर केले अशा मातांचा यावेळी सत्कार होणार आहे.

हेही वाचा – दातांची कीड, हिरड्यांचा आजार असलेल्यांना हृदयरोगाची जोखीम अधिक; नागपूरच्या मेडिकल रुग्णालयातील दंतशास्त्र विभागाचे निरीक्षण

समाजात आपल्या पाल्यांना चांगले नागरिक म्हणून घडविणाऱ्या मातांचा गौरव विविध मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे शेतकरी महिला आघाडीने नमूद केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Where is the only sita temple in india what was the curse pmd 64 ssb
Show comments