नागपूर : गर्दीच्या ठिकाणी, बाजारात किंवा बस-रेल्वेत अनेकांच्या मोबाईलवर हात साफ केल्या जातो. हरविलेला मोबाईल मिळणारच नाही, असा अनेकांचा समज असतो. मात्र, आता जर मोबाईल चोरी गेला किंवा हरवलाय तर नक्कीच पोलीस तक्रार करा. कारण, आता हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांनी ‘सीईएआर’ (सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर) ही प्रणाली सुरू केली आहे. यामुळे चोरीला गेलेला मोबाईल परत सापडण्यासाठी मदत होऊ शकणार आहे.शहरात दर आठवड्याला शेकडो मोबाईल चोरी जातात किंवा हरविल्याची नोंद होते. चालू वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत मोबाईल हरवण्याच्या ५ हजार ८२० घटना घडल्या आहेत. यातील अनेक घटनांत गुन्हे दाखल झालेले नाहीत. गेल्या चार महिन्यांत मोबाईल चोरीचे ४८ गुन्हे दाखल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>अबब! सहा हजाराचा कोंबडा तर चार हजाराची कोंबडी

बहुतांश घटनांमध्ये गुन्हेगार आणि अल्पवयीनांचा सहभाग असतो. हे मोबाईल इतर राज्यात पाठवले जातात. महागडे आयफोन नेपाळ व बांगलादेशमध्ये पोहोचतात. मोबाईल चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी आता एफआयआर नोंदवण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘हेल्प डेस्क’ तयार केला आहे. चोरी झालेल्या किंवा हरवलेल्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक टाकण्यासाठी पोलीस तक्रारदाराला कॉल करणार आहेत. चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाईल ब्लॉक करण्यासाठी पोलिस प्रथम एफआयआर दाखल करतील. यानंतर व्यक्तीला ‘सीईएआर’ पोर्टलवर जावे लागेल व त्यानंतर ‘ब्लॉक स्टोलन मोबाईल’वर क्लिक करावे लागेल.

हेही वाचा >>>चंद्रपूर: ब्रम्हपुरी वनपिरक्षेत्रात आढळला दुर्मिळ ‘फोस्र्टेन कॅट स्नेक’

त्यानंतर मोबाईल नंबर, आयएमईआय नंबर, डिव्हाईस बँड, डिव्हाईस मॉडेल किंवा स्मार्ट फोनची माहिती देऊन तो कुठे हरवला किंवा चोरीला गेला याची माहिती द्यावी लागेल. यासोबतच एफआयआरचा क्रमांक आणि तक्रारीची प्रतही अपलोड करावी लागणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Where to file a complaint when a mobile phone is lost nagpur adk 83 amy