नागपूर : मध्यभारतावरील पश्चिम-पूर्व कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकत असून येत्या पाच ऑगस्टपासून मान्सूनला ‘ब्रेक’ लागणची शक्यता आहे. दरम्यान, हवामान खात्याने आज रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. यामुळे अनेक भागांमध्ये सूर्यनारायणाने दर्शन दिले असून उष्णता जाणवू लागली आहे. जुलै महिन्यात तब्बल दोन आठवडे मूसळधार पाऊस पडून देखील वातावरणातील उकाडा कमी झालेला नाही. मान्सूनला ‘ब्रेक’ लागण्याची चिन्हे असली तरीही उर्वरित हंगामात विदर्भात पाऊस सरासरीपेक्षा अधिक, उत्तर व मध्य महाराष्ट्र तसेच कोकणात पाऊस सरासरीखाली, तर मराठवाड्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एक ऑगस्टला रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात अतिशय रिमझिम पावसाची शक्यता आहे. दोन आणि तीन ऑगस्टला कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टीवरील भागात पुढील पाच दिवसांत द्वीपकल्पीय भारत आणि पश्चिम भारताच्या उर्वरित भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होईल. पुढील पाच दिवसांत कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात एकाकी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर ओसरलेला राहील.