नागपूर: पावसाळ्यात घरोघरी वेगवेगळी फुले व शोभिवंत झाडे लावली गेल्या काही दिवसात शहरातील विविध भागातील नर्सरीमधून रोपांची विक्री वाढली आहे. घरात सुख-समृद्धी नांदण्यासाठी लोक वास्तूशास्त्राचा आधार अनेक जण घेतात. त्यानुसार घरात आणि अंगणात काही विशिष्ट झाडे लावल्यास समृद्धी येते, असा वास्तूशास्त्रज्ञ आणि ज्योतिष्यांचा दावा आहे. त्यामागे काय कारण काय आहे वाचा..
वेगवेगळ्या शहरामध्ये मोठ मोठी अपार्टमेंट निर्माण झाली असून घरांना अंगण असणे फारच दुर्मिळ गोष्ट झाली आहे. ज्यांच्याकडे अंगन नाही असे काही लोक टेरेसवर तर कुणी गॅलरीत झाडे लावण्याची हौस भागवतात. मात्र झाडे लावल्याने घरात आनंदच नाही तर संपत्ती येऊ शकते अशी समजूत. आहे. याबाबत वास्तूशास्त्रज्ञ व ज्योतिष्यचार्य विलास वखरे म्हणाले. वास्तुशास्त्रानुसार घरात आपण काही ठराविक प्रजातीची झाडे लावली, तर आपल्या घरातील आनंद द्विगुणित होईल. काही झाडे आरोग्याच्या दृष्टीनंही कुटुंबासाठी चांगली असतात. तर काही झाडे आपल्या जवळपास असल्यानं सौभाग्याचे रक्षण होते.
हेही वाचा… यवतमाळलगतच्या वाघाडीतील पूर ओसरला, वेदना कायम!; पाच हजारांची मदत देवून प्रशासनाने…
विशेष म्हणजे घरात बोन्साय घरात लावू नये, कारण हे वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही. ज्या झाडांमधून दूधासारखा द्रव पदार्थ निघतो, अशी झाडे सुद्धा घरात लावू नये. कॅक्टस सुद्धा घराच्या आत लावल्यास त्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वास्तु शास्त्रानुसार घरात ही झाडे घरात लावू नये. तर वास्तुशास्त्रानुसार जर आपल्या घरासमोर अंगण आहे तर आपण त्यात नारळाचे झाड अवश्य लावावे. जर अंगण नसेल तर मोठ्या कुंडीमध्ये आपण हे झाड लावू शकतो. फ्लॅटच्या गॅलरीत आपण नारळाचे कुंडीत लावलेले झाड ठेवू शकतो. हे खूपच शुभदायक मानले जाचे. नारळाच्या झाडामुळे मान-सन्मान वाढतो.. घरातील सदस्यांची जर प्रगती होत नसेल तर घरात वेली नक्की लावाव्यात. पिंपळाच्या झाडावर भूत-प्रेत राहतात हा अंधविश्वास आहे. मात्र पिंपळाचे झाड खूप शुभदायक आहे. पिंपळाचे झाड घरात नेहमी कुंडीतच लावले पाहिजे.
जर घरातील मुले अभ्यास करत नसतील किंवा हुशार नसतील तर आपण अशोकाचे झाड घरात लावावे. झेंडूचे झाड आपल्या घरात अवश्य असावे. या झाडामुळे गुरू बळ वाढते तसंच यामुळे वैवाहिक आयुष्य सुंदर होते आणि अपत्य प्राप्तीही होते असेही शास्त्रात असल्याचे वखरे यांनी सांगितले.