नागपूर: भरधाव कारने जात असताना स्टंटबाजी करणे दोन मित्रांच्या जीवावर बेतले. भरधाव कार झाडावर आदळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी मध्यरात्रीनंतर अंबाझरीत झाला. प्रणय रामेश्वर किरनाके (२२), गौरव दशरथ पेंदाम (२३) अशी मृतांची नावे आहेत. तर लिकांत कोमल कुलसुंगे (२३) गोंड मोहल्ला असे जखमीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रणय किलनाके हा लिकांत आणि गौरव यांच्यासह कारने फिरायला गेला होता. कँपस चौकातून स्वामी विवेकानंद स्मारकासमोरून जात होता. अंबाझरी उद्यानाकडे जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कार धडकली. यात तिघेही जखमी झाले.

हेही वाचा… सोलार कंपनीत स्फोट : ‘आता आम्ही कुणाच्या भरोशावर जगावं?’, आरतीच्या दिव्यांग आईवडिलांचा सवाल

मात्र, गौरव आणि प्रणयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर लिकांतची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरु आहे. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: While doing stunts the car crashed into a tree two people died and one was seriously injured in this accident at ambazari nagpur adk 83 dvr