लोकसत्ता टीम
चंद्रपूर : शेतात भात पिकाच्या रिवणीचे काम सुरू असतानाच भला मोठा अजगर निघाल्याने सर्वांच्याच उरात धडकी भरली. मात्र या अजगराला पकडुन जिवंत जंगलात सोडण्यात आले.
त्याचे झाले असे की, जिल्ह्यात सर्वत्र धान पिकाच्या रोवणीचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यातील मूल तालुक्यातील भंजाळी गावातील शेतात रोवण्याचे काम सुरू असताना अचानक अजगर साप आल्याने कामगार महिला घाबरल्या आणि शेत मालकाला माहिती दिली. शेत मालकाने सर्प मित्र उमेशसिंह झिरे यांना माहिती दिली देताच झिरे यांनी शेतात येवून अजगर सापाला पकडले. अजगर सापाला पकडून जंगलात सोडत जीवनदान देत सुटकेचा श्वास घेतला.
आणखी वाचा-नागपुरात चिकनगुनियाचे थैमान, शासकीय डॉक्टर संपावर…
वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी, दोन दिवसात दोन हल्ले
वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी झाल्याची मुल तालुक्यातील बोरचांदली येथे १२ ऑगस्ट सोमवारला २ वाजताच्या सुमारास घडली. विनोद भाऊजी बोल्लीवार (३६) रा. बारेचांदली असे जमखी गुराख्याचे नाव आहे. मुल येथे दोन दिवसात वाघाचे दोन हल्ले झाले आहेत.
बोरचांदली गावालगत असलेल्या जंगल परिसरात विनोद हा नेहमीप्रमाणे गुरे चराईसाठी नेला होता. दरम्यान झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने विनोद वर हल्ला करून जखमी केले. गुराख्याने आरडा-ओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतल्याने वाघ जंगलात पळून गेला. उपस्थितांना जखमी गुराख्याला मुल उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होत पाहणी करण्यास सुरूवात केली आहे.
© The Indian Express (P) Ltd