लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: कोळसा खाण वाटप गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने नागपूरचे उद्योगपती मनोज जयस्वाल यांना चार वर्षाची शिक्षा सुनावली. आपल्या श्रीमंती थाटासाठी प्रसिद्ध असलेले जयस्वाल नेमके आहे तरी कोण? यांच्याबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्सूकता आहे.

मनोज जयस्वाल यांनी २००५ मध्ये अभिजीत ग्रुपची स्थापना केली आणि अवघ्या आठ वर्षात ते नागपूरच नव्हे तर देशातील उद्योग ,व्यावसायिक वर्तुळात मोठे व्यक्ती म्हणून नावारूपाला आले. त्यांचा श्रीमंती थाटाची नागपूरच्या उद्योग विश्वात नेहमीच चर्चा होत असे. स्वतःच्या मालकीचे खासगी विमान असणारे ते नागपूरचे एकमेव उद्योगपती होते. त्यांनी बॉम्बार्डियर या जर्मन एअरफ्रेमरकडून १५०कोटी रुपये खर्चून जेट विमान विकत घेतले होते. हे विमान नागपूर विमानतळावरील हँगरवर उभे असायचे व त्याचा महिन्याला दीड कोटी रुपये खर्च होता.

आणखी वाचा-“आत्मविश्वासशून्य हिंदूमुळेच देशावर परकीय आक्रमणे” संभाजी भिडेंचे विधान; म्हणाले, “स्वार्थापोटी सख्ख्या…”

त्यांचा कोट पकडण्यासाठी वेगळा व्यक्ती त्यांच्यासोबत राहात असे. कोट घालून द्यायला, बूट घालून द्यायला माणसे ठेवली होती. या कुटुंबाकडे मर्सिडीज आणि इतर लक्झरी वाहनांसह इतरही अनेक गाड्यांचा ताफा होता त्याची चकचकीत जीवनशैली लक्ष वेधणारी ठरली. २००९ मध्ये त्यांच्या विवाह सोहळा अनेक महिने चालला. देशात बंगळुरू, मुंबई आणि दिल्लीसह अनेक शहरांत रिसेप्शनचे कार्यक्रम झाले निवडक निमंत्रितांना खासगी विमानातून कार्यक्रमस्थळी नेण्यात आले. बंगळुरू समारंभातील प्रमुख निमंत्रितांमध्ये तत्कालीन कोळसा मंत्री श्रीप्रकाश जैस्वाल आणि वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापकीय संचालक डीसी गर्ग यांचा समावेश होता. २०२२ मध्ये त्यांचा सीबीआयने अभिजीत ग्रुप विरुद्ध चार हजार कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकीसाठी एफआयआर दाखल केला होता. छत्तीसगड मधील कोळसा खाण वाटपातील गैरव्यवहार प्रकरणी त्यांना शिक्षा झाली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is manoj jaiswal who was convicted in the coal mine allocation case cwb 76 mrj
Show comments