लोकसत्ता टीम

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एका गावात एक महिन्यापासून घरांवर घगड येऊन पडतात. ही दगडफेक कोण करतय हे पोलीस सुध्दा अद्याप शोधून काढू शकले नाही. त्यामुळे गुढ कायम आहे. ईसासनी गावातील वार्ड क्र.४ भीमनगर येथे तब्बल एक महिण्यापासुन सुरू असलेल्या गोटमारीच्या सत्रामुळे येथील नागरिक भयभीत झाले असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत असुन गांवात भयाचे वातावरण पसरले आहे.

भीमनगर वार्ड क्र.४ लता मंगेशकर दवाखान्याच्या भिंतीलगत असलेल्या झोपड्यांवर गेल्या एक महिण्यापासून सकाळी ८ ते १० वाजताचे दरम्यान तर रात्री ११ वाजताचे दरम्यान घरांवर दगडफेक होत असून अनेकांच्या घरांच्या छत वरील सिंमेट पत्रे फुटले आहेत घरातील सामानांची नासधूस सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली आहे, तसेच अनेकांना किरकोळ इजा झाल्याने गांवात भयाचे वातावरण पसरले असून येथील नागरिक जीव मुठीत धरून आपल्या चिमुकल्या लेकराबाळांसह भयाच्या वातावरण मानसिक तनावात जीवन जगत आहे.

आणखी वाचा-नागपूर: ७ वर्षीय चिमुकलीवर जंगलात नेऊन अत्याचार

परीक्षेच्या काळात सदर घटनेचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत आहे . या बाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्रस्त नागरिकांनी दोन वेळा तक्रार नोंदविली .पण पोलिसांनी थातूर माथूर कारवाई केली आणि पिडीत नागरिकांनाच दमदाटी देवून आरोपींना स्वत:हाच शोधून पकडण्याचा सल्ला दिला असे जयेंद्र श्रीरामे, रविन्द्र चक्रपाणी, शैलेश डहाटकर, नाशिक लांजेवार, सिध्दार्थ साखरे, विकास पवार, टेभुर्ण, इंगोले यांनी सांगितले.

सदर घटनेतील आरोपीना त्वरित पकडून त्यांचेवर कायदेशिर कडक कार्यवाही करून पिडीतांना न्याय मिळवूण द्यावा व गोटमारीचे सत्र थांबविण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून केल्या जात आहे.

Story img Loader