वर्धा : शरद पवार यांच्या उपस्थितीत युवा नेते समीर देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणारा पक्षप्रवेश वेळेवर रोखण्यात आल्याची चर्चा बाहेर आली आहे.

पक्ष स्थापनेपासून व त्यापूर्वीही शरद पवार यांचे विश्वासू म्हणून माजी आमदार सुरेश देशमुख यांची ओळख आहे. त्यांचे पुत्र समीर देशमुख यांनी मात्र आघाडी धर्म न पाळता गत निवडणुकीत वेळेवर शिवसेनेचे तिकीट आणून रणजित कांबळे यांच्या विरोधात दंड थोपटले होते. पराभव चाखल्यानंतर ते कोणत्या पक्षात याची चर्चा होत राहिली. पुन्हा आपल्या घरट्यात परतण्याची त्यांची ओढ मुंबईतील गाठीभेटींनी दिसून आली.

हेही वाचा – गडचिरोलीतील स्थिती भयावह ! विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप, सूरजागड लोहप्रकल्पातील दाव्याचीही पोलखोल

हेही वाचा – विष्णू रुपात मोदी … नागपूरात पेन्टिंग प्रदर्शन ठरलं चर्चेचा विषय

पवारांच्या उपस्थितीत ते पक्षात येणार, असे संकेत दिसत असतांनाच काही नेत्यांचा पक्षप्रवेश सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा झाली. हे का? तर समीर देशमुख यांच्याचसाठी खेळी झाल्याचे नेते म्हणतात. पक्ष प्रवेशाबाबत मोहिते म्हणाले की, ‘तेच’ एक नाव होते. दुसरे होतेच कोण? असे विचारत त्यांनी कानावर हात ठेवले. श्रेष्टीच ठरवतील, मी कोण? असा पवित्रा त्यांनी घेतला. मात्र, सहकार गट त्यांनाच दोषी ठरवीत आहे.

Story img Loader