वर्धा : अध्यापन व संशोधन यापेक्षा अन्य कारणांनी गाजणाऱ्या येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी जाहिरात निघाली आहे. यापूर्वी कुलगुरू राहिलेल्या व्यक्तीची कारकीर्द चांगलीच गाजली होती. त्यानंतर प्रभारी कुलगुरू काम सांभाळत आहे. आता केंद्रीय शिक्षण मंडळाने या पदासाठी जाहिरात काढली आहे.
जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्यात ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करणारी व्यक्ती प्रतिष्ठित शिक्षणतज्ञ असावी. प्राध्यापक म्हणून किमान दहा वर्षांचा अनुभव, प्रतिष्ठित संशोधन किंवा शैक्षणिक प्रशासकीय संस्थेतील अनुभव असणे आवश्यक आहे.
हेही वाचा – आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी गुप्तचर विभाग; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
पदासाठी ६५ वर्ष वयोमर्यादा आहे. कायद्यात नमूद पगार, सेवा शर्ती व अटी, भत्ते लागू आहेत. अर्ज नमुना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. समितीने शिफारस केलेल्या नावातून नियुक्ती होणार आहे.