बुलढाणा : कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. यंदा प्रथमच दोन उपमुख्यमंत्री असल्याने मंदिर समिती पेचात सापडली आहे. ही पूजा कोणाच्या हस्ते करायची, यासाठी मंदिर समितीने शासनाचा सल्ला मागितला आहे. कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा केली जाते. १९९५ मध्ये पहिल्या युती सरकारच्या काळात सुरू झालेली ही प्रथा आजवर कायम आहे. मात्र राज्याच्या इतिहासात प्रथमच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे दोन उपमुख्यमंत्री असल्याने कुणाला आमंत्रण द्यायचे, याबाबत शासनाच्या विधी व न्याय विभागाचा सल्ला मागण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

यावरून सर्वसामान्य जनतेतही कुतूहल निर्माण झाले आहे. पालकमंत्री फेरबदलानंतर बुलढाणा जिल्ह्याची जबाबदारी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर सोपवण्यात आली. बुधवारी पालकमंत्री झालेले वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक दौऱ्यानिमित्त बुलढाण्यात दाखल झाल्यानंतर स्थानिक शासकीय विश्रामगृह परिसरात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना याच प्रश्नाला सामोरे जावे लागले. कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री म्हणून कोण विठ्ठलाची महापूजा करणार, असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी त्यांना विचारला. यावर थेट उत्तर देणे वळसे पाटील यांनी टाळले. कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री म्हणून कोण विठ्ठलाची महापूजा करणार, हे मुख्यमंत्री ठरवतील, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली.

Amol Kolhe on Devendra Fadnavis
Amol Kolhe: “…याचा अर्थ महायुतीचे सरकारच येणार नाही”, देवेंद्र फडणवीसांचे नाव घेत अमोल कोल्हेंची सूचक टिप्पणी!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Tiroda Constituency, Vijay Rahangdale,
तिरोड्यात पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार?
Narendra Modi Slams Uddhav Thackeray
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला, “राहुल गांधी ज्या दिवशी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणतील तेव्हा…”
Devendra Fadnavis, Sandeep Naik, Khairane MIDC office,
फडणवीस यांचे संदीप नाईकांना आव्हान, खैरणे एमआयडीसी कार्यालयात पत्रकार परिषद
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
Eknath shinde late for rally
भंडारा: साडेतीन तास लोटूनही मुख्यमंत्र्यांचा पत्ता नाही, लोकांचा सभास्थळाहून काढता पाय

हेही वाचा – “राजकारणात काहीही होऊ शकते,” धर्मरावबाबा आत्राम असे का म्हणाले?

हेही वाचा – नागपूर मेट्रोचा विस्तार : ४८ कि.मी. लांबी, ३२ नवीन स्थानके आणि ६,७०८ कोटींचा खर्च

अजित पवार नाराज! छे, छे… प्रश्नच उद्भवत नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चेत अजिबात तथ्य नाही. किंबहुना ते नाराज असण्याचा प्रश्नच उद्भभवत नाही, असा दावा पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी येथे केले. आर्थिक अडचणीत असलेल्या बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेला ३०० कोटींचे ‘सॉफ्ट लोन’ देण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले होते. त्यानंतरच आमदार शिंगणे त्यांच्यासोबत आले. त्यामुळे बँकेला कर्ज मिळणार का आणि केव्हा? असे प्रश्न उपस्थित केले असता अजित पवार यांनी शब्द दिल्याने मी त्यावर बोलणे योग्य होणार नाही. यासाठी आपण प्रयत्न करणार का? असे विचारले असता आमदार शिंगणे व अजित पवार यांच्यात मध्यस्थी करण्याचे फारसे काम नाही. आमदार शिंगणे त्यांना थेट भेटू शकतात. यासाठी सहकारमंत्री म्हणून आपण सहकार्य करणारच, अशी ग्वाही वळसे पाटील यांनी दिली.