अकोला : कट्टर हिंदुत्ववादी आमदार म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते गोवर्धन शर्मा यांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख होती. पाकिस्तानातील ‘द डॉन’ वृत्तपत्रानेदेखील त्यांच्या कार्याची दखल घेऊन २०१४ मध्ये त्यांच्यावर ‘हिंदुत्ववादी नेता’ म्हणून लेख प्रसिद्ध केला होता. जनमानसात मिसळून जात-पात, धर्म न बघता सर्वसामान्यांच्या मदतीला ते धावून जात होते. प्रत्येकाच्या सुख-दु:खात सहभागी होणारे अकोलेकरांच्या आपुलकीचे नेतृत्व आमदार गोवर्धन शर्मा शुक्रवारी काळाच्या पडद्याआड गेले. सर्व जाती, धर्माची मतदारसंख्या असताना अकोल्यातून सलग सहा वेळा विधानसभेवर निवडून येण्याची किमया त्यांनी अगदी लिलया पार पाडली. अकोल्यात समाजसेवेचा ‘लालजी पॅटर्न’ तीन दशकांपासून प्रसिद्ध झाला.

सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत राहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि रामभक्त अशी आमदार गोवर्धन शर्मा यांची ओळख होती. पश्चिम विदर्भात भारतीय जनता पक्ष वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. प्रमोद महाजन, स्व. पांडुरंग फुंडकर, स्व. प्रमिलाताई टोपले, स्व. वसंतराव देशमुख, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जात. पक्ष संघटनेची मजबूत बांधणी करून अकोल्यात भाजपाचे त्यांनी निर्विवाद वर्चस्व व दबदबा निर्माण केला. अकोलेकरांवर कोणतेही संकट ओढवले तरी धाऊन जाणारी व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती.

Rajnath Singh, Shivajinagar candidate Siddharth Shirole,
महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना घेऊन काँग्रेस बुडणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
disha patani father Jagdish Singh patani
अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची फसवणूक; बढती देण्याचं आमिष दाखवत २५ लाख लुबाडले
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
Action against those who lure voters in Malegaon
मतदारांना प्रलोभन देणाऱ्या विरोधात मालेगावात कारवाई

हेही वाचा – क्रुरतेचा कळस! “तू आमच्यावर ओझे आहेस”, असे म्हणत नातवाने आजीला संपविले

आमदार गोवर्धन शर्मा यांचा १ जानेवारी १९४९ रोजी पुसद येथे जन्म झाला. भाजपामध्ये त्यांनी कोषाध्यक्ष ते प्रदेश कार्यकारिणीवर जबाबदारी सांभाळली. ‘लालजी’ या नावाने ते सुपरिचित होते. १९८५ ते १९९५ पर्यंत ते अकोला नगर परिषदेवर नगरसेवक व सभापती म्हणून कार्यरत होते. १९९५ मध्ये ते सर्वप्रथम विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. अपराजीत नेता म्हणून त्यांचा नावलौकिक होता. मंत्रिमंडळात १९९५ ते १९९७ राज्यमंत्री म्हणून त्यांनी कार्य केले. यवतमाळचे ते पालकमंत्री होते. विदर्भवादी नेता म्हणून ते ओळखले जात. १९८५ – १९९० पर्यंत श्रीराम जन्म भूमी आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. कारसेवक म्हणून झाँसी येथे १५ दिवस त्यांना अटक झाली होती. अकोल्यातील जनसामान्यांच्या मनात आमदार गोवर्धन शर्मा यांचे स्थान होते. श्रीराम नवमी शोभायात्रा व भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाला त्यांनी प्रारंभ केला. शोभायात्रा समितीच्या माध्यमातून दुर्धर व पीडित वंचितांना मागील ३० वर्षांपासून मदतीचा हात त्यांनी दिला. रामदेव बाबा, सालासर हनुमान मंदिर आदींसह अनेक संस्थांनचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पश्चिम विदर्भातील सर्वशाखीय ब्राह्मण समाजाला त्यांनी एकत्रित करण्याचे कामही केले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला त्यांनी मदतीचा हात दिला. जनसंपर्काच्या माध्यमातून चेतना जागृती निर्माण केली. विदर्भातील हिंदू समाजाच्या मदतीसाठी ते सदैव तत्पर होते. पाकिस्तानातील विस्थापित हिंदूंना दिल्ली येथे जाऊन त्यांनी मदत केली. ओडिशा येथील बिल्लारे, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, गुजरात येथे संकटकाळात ते मदतीसाठी धावून गेले. शहीद सैनिकांच्या परिवारांना बिहार, छत्तीसगड, कोल्हापूर, अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यात जाऊन धीर देत मदत केली. राजकारणासह धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे अमूल्य योगदान होते.

हेही वाचा – भाजपचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन

मोबाईल न वापरणारे आमदार….

अत्यंत धार्मिक वृत्तीचे आमदार, सुपरिचित ‘लालजी’ यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते मोबाईल न वापरणारे नेते होते. मोबाईल किंवा डायरी सोबत नसतानाही अनेकांचे संपर्क क्रमांक आमदार शर्मा यांना तोंडपाठ होते. कार्यकर्ते किंवा ओळखीच्या मंडळींच्या दुचाकीवर मागे बसून सर्वसामान्यांमध्ये अगदी सहजरित्या मिसळत होते. पांढरा कुर्ता-पायजामा हा त्यांचा ठरलेला पोषाख होता. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या अलौकिक कार्यासाठी ते अकोलेकरांच्या सदैव स्मरणात राहतील.