नागपूर : करोना काळात रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी प्रवास भाड्यातील सवलत बंद केली होती. ती अजूनही सुरू झालेली नाही. त्याचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत असून गेल्या तीन वर्षांत १५ कोटींंहून अधिक ज्येष्ठ नारिकांनी पूर्ण तिकिटाच्या रूपात रेल्वेला कोट्यवधी रुपये अतिरिक्त दिले आहेत.

टाळेबंदीपूर्वी (२० मार्च २०२०) रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांपैकी महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के तर पुरुषांना ४० टक्के सवलत दिली जायची. परंतु, नंतर करोनाच्या नावाखाली रेल्वेने ही सवलत बंद केली. ती अद्यापही सुरू झालेली नाही. याचा फटका वयोवृद्ध, सेवानिवृत्तांना बसत आहे. गेल्या तीन वर्षांत १५ कोटी २६ लाख ५३ हजार ४२६ ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वेने प्रवास केला. त्यांना पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागला. हा तपशील माहिती अधिकारातून समोर आला आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन वर्षांत १५ कोटी २६ लाख ५३ हजार ४२६ ज्येष्ठ नागरिकांनी पूर्ण भाडे भरून रेल्वेचा प्रवास केला.

Assembly Election 2024 Extra Rounds of Best Bus on Polling Day Low floor deck buses will run for disabled elderly voters
मतदानाच्या दिवशी बेस्ट बसच्या जादा फेऱ्या; दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी ‘लो फ्लोअर डेक’ बस धावणार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही

हेही वाचा – नागपूर : बलात्काराची तक्रार देण्याची धमकी; फेसबुकवर ‘लाईव्ह’ करून तरुणाची आत्महत्या

हेही वाचा – नाना पटोले म्हणतात, “‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ला विरोध नाही, मात्र निवडणुका…”

या अतिरिक्त वसुलीनंतरही प्रवासी सुविधा वाढलेल्या नाहीत. उलट शयनयान कमी केले जात आहेत आणि शयनयान डब्यात अनारक्षित तिकीटधारकांना प्रवेश दिला जात आहे. रेल्वेने ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक यांची सवलत पूर्ववत करावी. – बसंतकुमार शुक्ला, अध्यक्ष, भारतीय प्रवासी यात्री केंद्र.