लोकसत्ता टीम

चंद्रपूर : महापालिका भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. अमृत योजनेच्या पाईपलाईनचे काम ५५० असून त्यांचे निम्मे काम झाले असतांना ४५० किलोमीटरचे बिल काढण्यात आले. त्यातून प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला आहे.पाण्याच्या टाक्यांचे निकृष्ट बांधकाम झाले आहे. अमृतची एसआयटी किवा निवृत्त न्यायाधीश मार्फत चोकशी करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
judge detained corruption charges
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश लाचप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
impeachment motion against justice Shekhar Yadav
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोगाची शक्यता; महाभियोग म्हणजे काय? आजवर किती न्यायाधीशांवर झाली कारवाई?
supreme court marital dispute case
‘नवरा आणि सासरच्या लोकांचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरूपयोग नको’, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
Supreme Court
Supreme Court : बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांच्या वक्तव्याची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल; मागवली माहिती

अमृतचे काम करताना कंत्राटदाराने दुय्यम दर्जांची पाईपलाईन असल्यामुळे १६ प्रभाग पैकी १२ प्रभागातील हजारो घरात पाणी आले नाही. त्यामुळे शहरावर जलसंकट आहे. असे असतांना नव्याने ३८० कोटीची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.

आणखी वाचा-विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक डुप्लिकेट ओबीसींची…

त्यामुळे प्रशासक व त्याला साथ देणाऱ्या मंडळीसाठी महापालिका भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याचा घणाघाती आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला. तसेच पालिकेत कंत्राटी पद्धतीने घनकचरा उचलण्याचे काम सुरू असून निविदा न काढताच काम दिण्यात आले आहे. त्यामुळे यातसुध्दा मोठा भ्रष्टाचार झाला आहे. पालिकेत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून दरमहाव वसुलीचे काम सुरू असून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही वडेट्टीवार यांनी यावेळी केली. वैद्यकीय महाविद्यालय जनावरांचा गोठा झाला असून महाविद्यालयात आवश्यक त्या औषधे व यंत्र सामुग्री उपलब्ध नाही.

आणखी वाचा-चंद्रपूर : गटशिक्षणाधिकारी खंडाळे एसीबीच्या जाळ्यात

वरिष्ठ डॉक्टर रूग्णालयात हजर राहत नाही. रूग्णालय कनिष्ठ व शिकाऊ डॉक्टराच्या भरोश्यावर सुरू आहे. २३६ सुरक्षारक्षक आवश्यक असताना केवळ ४५ सुरक्षा रक्षक कार्यरत आहे. त्यामुळे डॉक्टरांवर हल्ले होत आहे. त्यामुळे डॉक्टरांना आंदोलन करावे लागत आहे. ५०१ कंत्राटी पदापैकी ३३८ पदे भरली गेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. त्यामुळे तातडीने पदे भरण्यात यावी. याकडे तिघांडी सरकारचे लक्ष नसून हे सरकार लोकांसाठी नाही तर केवळ कंत्राटदारासाठी असून तिजोरी लुटण्यावर भर असल्याचेही ते म्हणाले.पत्रकार परिषदेला नंदू नागरकर, राजेश अडुर, कुणाल चहारे उपस्थित होते.

Story img Loader