लोकसत्ता टीम

नागपूर : कुठलाही हॉटेल व्यवसायिक किंवा फुटपाथवर चहा विक्रीचा व्यवसाय करणारा असो, दररोज सकाळी दुकान उघडल्यानंतर चहा किंवा नाश्ता तयार केल्यावर तो प्रथम रस्त्यावर टाकतो. नमस्कार करतो आणि त्यानंतर ग्राहकांना चहा देत असतो. या मागे अंधश्रद्धा आहे की काही शास्त्रीय कारण आहेत.

Is Dandelion Tea Really Beneficial
कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra winter updates
स्वेटर, शॉल शोधलीत का…? कारण, उद्यापासून हुडहुडी…
Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths In Kalyan
कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे

सकाळी अनेक लोक मॉनिंग वॉक करुन चहा किंवा नाश्तासाठी एखाद्या हॉटेल किंवा फुटपाथवरील चहाच्या टपरीवर जात असतात. मात्र चहा विक्रेता दुकान उघडल्यावर आणि गरमागरम चहा किंवा नाश्ता तयार केल्यावर तो ग्राहकांना न देता प्रथम रस्त्यावर टाकून नमस्कार करतो. या संदर्भात शहरातील बडकस चौकातील केशव चहावाला यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले दुकान सुरू केल्यावर आम्ही प्रथम भूमीला वंदन करण्यासाठी तयार केलेला चहा किंवा एखादा पदार्थ आम्ही रस्त्यावर टाकत असतो. त्यामागे शास्त्रीय किंवा वैज्ञानिक कारण काय आहे माहिती नाही मात्र अनेक वर्षापासूनची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार आम्ही ते करत असतो. शिवाय तयार केलेला चहा किंवा खाद्य पदार्थ भूमीला अर्पण करुन आपला व्यवसाय दिवसभर चांगला चालावा अशी एक भावना आहे. ज्योतिष्यार्य प्रीती राजंदेकर यांनी सांगितले की या मागे विक्रेत्यांनी तयार केलेला चहा किंवा खाद्य पदार्थ केवळ भूमीला अर्पण करणे एवढाच आहे. त्यात कुठलेही धार्मीक किंवा शास्त्रीय कारण नाही.

आणखी वाचा-ताडोबात वाघ आणि कोब्रा यांच्यातील थरार, ‘ती’ २५ मिनिटे अन्…

तर काही चहा विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार रस्त्यांवर रोज कितीतरी अपघात होतात. त्यात काही जणांचे हकनाक जीव जातात. त्यात जीव गेलेले तिथेच अपघाताच्या जागेवरच वास्तव्य करतात अशी समजूत आहे. माहित नसतात की नेमके किती जीव असे गेलेत आणि त्यातले कोणते चांगले कोणते वाईट , आपल्याला दिसत नाहीत म्हणून त्याचे अस्तित्व नाकारता येत नाही. त्यामुळे जिथे आपले दुकान आहे त्या ठिकाणी आदरभाव दाखवायला आणि आपला प्रवास सुखकर होण्यात कुठलीही आडकाठी नको म्हणून त्यांना शांत करण्यासाठी दुकानासमोर काही गोष्टी अर्पण कराव्या लागतात. त्यात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने तयार केलेला पदार्थ रस्त्यावर टाकत असतो. त्यात आम्ही मात्र चहा- नास्ताचा व्यवसाय करणारा सुद्धा दिवसाची सुरुवात म्हणून तो चहा अर्पण करत असतो. हा अंधश्रद्धेचा भाग आहे अशी जरी काही लोकांची भावना असली तरी त्या मागे काही तरी शास्त्रीय कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.